मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी निर्गमित केला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे २…
धाराशिव / प्रतिनिधी केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे वाढ केली आहे. गॅस सिलेंडर नोंदणीचा कालावधी सुद्धा वाढविला आहे. तरी देखील ऑनलाईन नोंदणी होत नाही. गँस पुरवठा सुरळीत करण्यात यावा अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला आहे. गॅस दरवाढ मागे घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि भूसंपादन…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात स्वयम् शिक्षण प्रयोग व एलआयसी लिडर यांच्या मार्गदर्शनाखाली गटाच्या महिलांचा कर्तृत्वाचा महिला सन्मान. स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवणाऱ्या आणि संकटांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज परंडा येथे महिला व बालकल्याण विभाग चे सीडीपीओ गणेश कुकडे, पंचायत समिती विशेष घटक योजनेचे सुरज बोडके, डायरेक्टर…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण बैठक आज १२ मार्च रोजी घेण्यात आली.जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,गॅस एजन्सीचे जिल्हा नोडल अधिकारी रिजवान पटेल तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक…
तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वाघोली पुणे येथे होत असलेल्या “महाराष्ट्र केसरी” कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास देण्यात येणाऱ्या मानाच्या गदे चे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या चरणी विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील पैलवान,वस्ताद आणि कुस्ती शौकीन यांची लक्षणीय उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६८वी , ” महाराष्ट्र केसरी ” कुस्ती…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही.पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिवच्या नूतन नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, डॉ. दिपाली इंगळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री मते यांची उपस्थिती…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे विराट हिंदू सम्मेलनाचे २१ मार्चला आयोजन करण्यात आले आहे. तेर येथे आयोजित विराट हिंदू संमेलनाच्या अध्यक्षपदी अँड .बालाजी भक्ते,उपाध्यक्षपदी सुधाकर रावळे ,तेजस नाईकवाडी,सचिवपदी गणेश उंबरे, कोषाध्यक्षपदी -नागनाथ कचार, संरक्षकपदी सौरभ जाधव,सदस्यपदी नवनाथ पांचाळ, नरहरी बडवे, विशाल भक्ते,सचिन एडके,विष्णू भंडारे,विजय खांडेकर, श्रीजीत इंगळे,प्रवीण बंडे,दत्ता भोसले,बालाजी थोरात,दत्ता पंडीत,नारायण…
धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन हरभरा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी व राज्याच्या कृषी मंत्र्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाची लागवड करतात. शासनाने हरभरा खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली असली तरी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी ही अट बंधनकारक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा किंवा तांत्रिक ज्ञानाची कमतरता असल्यामुळे वेळेत ई-पीक पाहणी नोंदविता येत नाही. त्यामुळेअनेक शेतकरी ऑनलाइन हरभरा खरेदी नोंदणीपासूनवंचित राहत असून शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी असलेली ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
धाराशिव / प्रतिनिधी स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ गतीने होत असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सांगत हा प्रश्न अधिवेशनात मांडला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी…
जागतिक महिला दिन साजरा धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम होऊन समाजाच्या सर्व क्षेत्रांत पुढे यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,धाराशिव, महिला व बाल विकास विभाग जि.प.धाराशिव आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 9 मार्च…