धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षास सुरुवात होत असून 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 या वर्षांमध्ये महात्मा फुले यांची जयंती वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. वर्षभरासाठी एकच समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून सामाजिक…
तेर – धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात पापमोचणी एकादशीमुळे गर्भगृहात द्राक्षाची सजावट करण्यात आली.पापमोचणी एकादशीमुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील व सीईओ घोष यांनी दाखविली हिरवा झेंडा धाराशिव / प्रतिनिधी समग्र शिक्षाच्या राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत धाराशिव जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची राज्याबाहेरील शैक्षणिक सहल बेंगलोर मार्गे केरळकडे आज रवाना झाली. विद्यार्थ्यांच्या गाड्यांना जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील , मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ मैनाक घोष , शिक्षणाधिकारी (प्रा) रवींद्र खंदारे , जि.प. सदस्य प्रदीप शिंदे यांनी…
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप . परंडा / प्रतिनिधी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा परंडा,भुम,वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार , शिवजल क्रांतीचे प्रणेते विकास रत्न प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना,युवासेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सभापतीचे प्रतिनिधी तथा शिवसेना पक्षाचे परंडा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लातूर – तुळजापुर रस्त्यावर पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने प्रथम वॅगनार कारला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात होंडा सिटी कारमधील एका ज्येष्ठाचा मृत्यू…
भाविकांसाठी सोयीचा मार्ग; दररोज हजारो भाविकांच्या वाहनांची ये-जा – वेळ, इंधन आणि पैशांची मोठी बचत तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथून अक्कलकोट कडे जाण्यासाठी हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्गे तीर्थक्षेत्र अक्कलकोट हा भाविकांसाठी अधिक सोयीचा व वेळेची बचत करणारा रस्ता ठरत असल्याने हा रस्ता दोन पदरी करण्याची मागणी जोर धरत आहे. उर्वरित सोलापूर उमरगा नळदुर्ग महामार्गावरून जाण्यास…
धाराशिव / प्रतिनिधी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग,महाराष्ट्र शासन,दे आसरा फाऊंडेशन आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उपपरिसर धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्थळ – ऑडिटोरियम हॉल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,एम.आय.डी.सी कॅम्पस,धाराशिव येथे उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उद्योजक मेळाव्यामध्ये व्यवसायाला चालना देणे,नवीन कल्पना (Ideas)…
धाराशिव / प्रतिनिधी हिंदूंनी जातीभेद बाजूला ठेवून संघटित राहण्याची गरज असून इतिहासात एकत्रित शक्तीचा अभाव असल्याने हिंदू समाजाला दीर्घकाळ गुलामगिरीचा सामना करावा लागल्याचे नमूद करत सामाजिक ऐक्य ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक समरसता मंचाचे क्षेत्र समन्वयक निलेश गद्रे यांनी केले. धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी वारकरी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव, लातूर व बार्शी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर–मुरुड–ढोकी–येडशी –बार्शी–टेंभुर्णी या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण व्हावे अशी बऱ्याच वर्षापासून मागणी प्रलंबीत होती. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात तसेच मंत्री महोदय नितीनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत 29 सप्टेंबर 2019, 21 नोव्हेंबर 2021 लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान प्रश्न क्र. 71 व्दारे तारांकीत प्रश्न विचारला होता. त्यानंतर 09 मार्च 2021 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नियम 377 व्दारे लक्षवेधी…
धाराशिव / प्रतिनिधी घरात आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही वडिलांच्या स्वप्नांना आकार देणारे पुत्र म्हणजे राम गरड. शेतमजुरी करून आपल्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण द्यावे, हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाची निवड केली. या निवडीनेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. मेकॅनिकल विभागाने…