Live News…..Breaking News!

.

  • लोहारा पंचायत समिती सभापती पल्लवी जानकर व उपसभापती अमोल पाटील यांनी स्विकारला पदभारमाजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड व माजी आ.ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती

    लोहारा / प्रतिनिधी लोहारा पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती पल्लवी जानकर व उपसभापती अमोल पाटील यांनी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड व शिवसेना उपनेते तथा उमरगा- लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.16 मार्च 2026 रोजी पदभार स्विकारला. लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात नूतन सभापती उपसभापतींचा पदभार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास…

  • वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ. सावंत यांचा नगराध्यक्ष सौदागर यांच्यातर्फे सत्कार

    परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे माजी पालकमंत्री व भूम -परांडा- वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.डाँ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे त्यांचा परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौदागर यांचे चिरंजीव वसीम सौदागर , कैफ सौदागर, अबूतला सौदागर , मुसा कुरेशी ,गौस शेख आदीसह आमदार…

  • धाराशिव जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर                 

    धाराशिव / प्रतिनिधी सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील प. सा. नाट्यमंदिर, टिळक पथ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना…

  • जिल्ह्याला रस्ते आणि पुलांसाठी ६२ कोटीअर्थसंकल्पात तरतूद आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती 

    परंडा, कळंब, तुळजापूरसह सर्वच तालुक्यांतील दळणवळण होणार सुसाट धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात धाराशिव जिल्ह्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्ह्यातील विविध राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसह नवीन पुलांच्या बांधकामासाठी तब्बल ६२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाला…

  • तेरच्या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीर संपन्न

    तेर ( म.नेता.) जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प जिल्हा रुग्णालय धाराशिव यांचे अंतर्गत मोफत ताण तणाव निवारण व सर्वरोग निदान शिबीर तेर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केले होते .या शिबिराचे उद्घाटन मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजसेवा अधीक्षक ज्ञानोबा शेळके , व्यसनमुक्ती समुपदेशक हर्षदा नारायणकर,वैद्यकीय अधीक्षक गुरुबस शेटे…

  • साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागेचा ताबा नगरपरिषद धाराशिवकडे सुपूर्दमुख्यमंत्री , महसूल मंत्री व आमदार राणादादांचे पालिकेने मानले आभार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील मातंग समाज बांधवांसाठी ऐतिहासिक निर्णय झाला असून मागील ४० वर्षापासून प्रलंबीत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शहरातील शासकीय दूध डेअरी येथील एक एकर जागेचा ताबा नगरपरिषद धाराशिवकडे सोपविण्यात आला आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, धाराशिव जिल्ह्याचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण…

  • केसरजवळगा पीएम श्री जि. प. शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

    मुरूम ( म. नेता ) पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनीच शाळेचे विविध प्रशासकीय कामकाज सांभाळत शिक्षकांची भूमिका पार पाडली.या उपक्रमात कु. सोनाक्षी युवराज गायकवाड यांनी मुख्याध्यापक म्हणून तर आमान सादिक इनामदार यांनी उपमुख्याध्यापक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कार्य प्रत्यक्ष अनुभवत…

  • लोक अदालतीमध्ये 7 हजार 760 प्रकरणे तडजोडी अंती निकाली

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिनांक 14 मार्च रोजी करण्यात आले होते.या लोकअदालतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती अभिश्री देव,जिल्हा न्यायाधीश एस.जी.ठुबे,आर.के.खोमणे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील आदी यावेळी उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये एकूण 12 हजार 178 प्रलंबित प्रकरणे व दावापूर्ण एकूण 18…

  • रमजान निमित्त एहसास फाउंडेशनतर्फे गरजूंना १५० राशन किटचे वाटप

    कळंब / प्रतिनिधी पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने कळंब येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एहसास फाउंडेशनच्या वतीने यावर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे सुमारे १५० रमजान राशन किटचे वाटप करण्यात आले. एहसास फाउंडेशनने रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे. या उपक्रमाचा…

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला सुरक्षा विषयक कार्यशाळा संपन्नविविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनींचा केला सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील कायदे आणि जनजागृती यावर आधारित एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत “जेंडर सेन्सिटायझेशन व पॉश अँक्ट तसेच वुमन्स एम्पॉवरमेंट या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी नाशिकच्या नामांकित पॉश ट्रेनर  ऋता पंडित यांनी जेंडर सेन्सिटायझेशन , प्रचलित महिला सुरक्षा कायदे, तसेच…