धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाबाबत विशेष मागणी धाराशिव / प्रतिनिधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मराठवाड्याच्या विकासासाठी सक्षम रेल्वे सुविधा अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करत त्यांनी खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपयाची…
धाराशिव / प्रतिनिधी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारातून प्रेरित शबरी आवास योजना ही घरकुल योजना विशेषतः आदिवासी व वंचित घटकांसाठी राबविण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे घर नसलेल्या कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाने राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध करून देणे.या योजनेअंतर्गत शेळका धानोरा ता.कळंब येथील आदिवासी पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी शासनाकडून जमीन उपलब्ध…
धाराशिव / प्रतिनिधी शालेय पोषण आहारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी शिवाय याची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत शिक्षण मंत्र्यांकडे केली. यावर शिक्षण मंत्री यांनी सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की,…
येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये,यासाठी किमान १० ते १५ दिवसांसाठी अतिरिक्त गॅस कोटा मंजूर करून तात्काळ सुरळीत पुरवठा करावा,अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. येरमाळा येथील व्यावसायिकांचे हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी स्विकारले.या निवेदना सोबत देवस्थान ट्रस्ट आणि…
परंडा / प्रतिनिधी पवित्र रमजान महिन्यानिमित्त परंडा शहरातील संगम पार्क येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संगमपार्क मधील विविध धर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली. उपवास (रोजा) सोडण्याच्या वेळी उपस्थितांनी एकत्र येऊन इफ्तार घेतला. या प्रसंगी खजूर, फळे, शरबत व विविध खाद्यपदार्थांची…
ढोकी / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सम्राट फंक्शन कार्यालय, लातूर येडशी रोडवर असलेल्या या कार्यालयात सकल मराठा समाजाच्यावतीने रविवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मोफत मराठा वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२९ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्याच्या नियोजनासाठी तयारी अंतिम टप्प्यात आसून या नियोजनात भोजन व्यवस्था,बॅनर…
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस,गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई,दि.१७ मार्च: १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ,मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १७ मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील.यात विदर्भ, मराठवाडा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातून वाहणाऱ्या पाच नद्यांच्या पवित्र जलाचे पूजन धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांच्या हस्ते करून जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. जल जागृती सप्ताह निमित्त अधीक्षक अभियंता, धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव येथे हा सोहळा पार पडला. यावेळी तेरणा, मांजरा, सीना , बेन्नीतुरा व बोरी या पवित्र नद्यांचे जलपूजन करण्यात आले.…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिकेने २३ सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषदेच्या तांत्रिक सल्लागार पॅनल मध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून नेमलेल्या व्यक्तीस शहरातील अनेक विकास कामे देत नियम भंग केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व तांत्रिक सल्लागारावर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी काँग्रेस नगरसेवक सुधीर पोतदार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांना…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी यांचेवतीने महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त 16 मार्च रोजी कारखाना साईटवर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन अजित भोसले, डिस्टीलरी…