Live News…..Breaking News!

.

  • संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथेला भाविक भक्तीरसात चिंब

    धाराशिव / प्रतिनिधी सकल संत सेवा समिती धाराशिव आयोजित बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे चालू असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्र कथेला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून ,वैराग्य महामेरू संत गोरोबाकाका यांचे चरित्र लेखक कथाकार हभप दीपकजी महाराज खरात( श्रीक्षेत्र तेर) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय कथेत रंगदेवता अवतरलेली आहे. या धार्मिक  सोहळयाची…

  • लोहारा शहरात स्वंतत्र डीपीचे माजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन

    लोहारा / प्रतिनिधी लोहारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लाईटमुळे अडचण निर्माण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन लोहारा नगरपंचायतने शहरातील नळ योजनेच्या विहिरी जवळच्या पुलाजवळ 4 लाख रुपयाची स्वंतत्र डीपी मंजूर करुन काम पुर्ण करण्यात आले. या डीपीचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील,…

  • मुळज येथील दत्तात्रय (राजेसाहेब) चालुक्य यांचे निधन

    धाराशिव / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील मुळज येथील दत्तात्रय (राजेसाहेब) शिवरामपंत चालुक्य (वय 75 वर्षे) यांचे दि.22 मार्च रविवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते कै.शिवाजीदादा चालुक्य यांचे काका व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, मुळज गावचे माजी सरपंच सयाजी चालुक्य यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर मुळज येथील त्यांच्या…

  • एकलव्य विद्या संकुलात माजी विद्यार्थी मेळावा व क्रिक्रेट स्पर्धेंचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यमगरवाडी तालुका तुळजापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा व क्रिकेटच्या भव्य स्पर्धांचे उद्घाटन तुळजापूर येथील पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष व तरुण उद्योजक गणेश पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेटच्या स्पर्धेसाठी यमगरवाडी येथील माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धांचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध…

  • कळंब येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह अन् शिवमहापुराण कथा सोहळ्याचा जागर

    कळंब / शहर प्रतिनिधी कळंब शहरातील कसबा पेठ येथील ऐतिहासिक दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे दिनांक २३ मार्च सोमवार ते २ एप्रिल गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून भव्य अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे कळंब शहरासह परिसरात भक्तीमय चैतन्य पसरले आहे. या धार्मिक  सोहळयात…

  • जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद नष्ट करून हिंदू वोट बँक निर्माण करा- कालीपुत्र कालीचरण महाराज

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद नष्ट करून हिंदू वोट बँक निर्माण करा असे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले. शनिवार दि. 21 मार्च रोजी रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कालीचरण महाराज बोलत होते. रूपामाता…

  • आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड येथे- प्रा.डाँ. अभिमन्यू टकले

    धाराशिव / प्रतिनिधी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील होळकर वाड्यात 11 व 12 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक प्रा. डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.शुक्रवार दि. 20 मार्चच्या सायंकाळी धनगर साहित्य संमेलन नियोजन बैठक धाराशिव येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. टकले…

  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी भव्य वैद्यकीय व दंत शिबिर;सर्व रोगांवर होणार मोफत तपासणी व उपचार

    तुळजापूर / प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत भव्य वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे पार पडणार आहे. या शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांवर मोफत तपासणी,…

  • छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांचा तुळजापुरात सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास, तसेच पाणी व कचरा व्यवस्थेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत, अशी प्रार्थना छत्रपती संभाजीनगरचे नूतन महापौर समीर राजूरकर यांनी तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी केली. तुळजापूर भेटी दरम्यान आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. महापौर श्री राजूरकर यांचे तुळजापूरमध्ये आगमन होताच स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने…

  • चिमण्या आपल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे – डॉ शहाजी चंदनशिवेरा गे शिंदे महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा.

    परांडा / प्रतिनिधी चिमण्या हा आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे त्या कीटकनाशक म्हणून काम करतात आणि अन्नसाखळीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतात असे मत डॉ शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले. परांडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…