Live News…..Breaking News!

.

  • श्रीराम नवमी निमीत्त धाराशिव जिल्हयात आज भाजपाकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन

    नागरिकांंना सहभागी होण्याचे आवहान धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, जिल्हा धाराशिव च्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये उद्या गुरुवार दि.२६ मार्च रोजी प्रभू श्रीरामांची जयंती (श्रीराम नवमी ) निमीत्त जिल्ह्यामध्ये सर्वत्र भव्य शोभायात्रा आयोजित करून साजरी केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन भाजपा…

  • पंचायत समितीच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवानवनिर्वाचित सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या प्रशासनास सूचना

    मुरुम   ( म. नेता ) मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज असल्याने काही प्रमाणात संबंधित शासकीय यंत्रणेचे काम कासवगतीने सुरू होते. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. याच अनुषंगाने मंगळवार दि.२४ मार्च रोजी उमरगा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती ॲड.आकांक्षाताई चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड व…

  • रा गे शिंदे महाविद्यालयात जागतिक क्षयरोग दिन जनजागृती कार्यक्रम संपन्न.

    परंडा  /  प्रतिनिधी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालय परंडा आणि डॉ दीपक निंभोरकर तालुका आरोग्य अधिकारी व डॉ जुबेर मोमीन वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन 2026 हा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला. डॉ अतुल हुंबे व…

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करिअरच्या उत्तम संधी१५ लाख पॅकेजवर नोकरी करणाऱ्या माजी विद्यार्थिनी आश्लेषा मंडाळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    धाराशिव   /  प्रतिनिधी  पदवी शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना सर्वोच्च पगाराच्या रोजगार संधी सहज उपलब्ध होतात, असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थिनी आश्लेषा अशोक मंडाळे यांनी केले. महाविद्यालयातर्फे आयोजित “मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या संधी” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या. आपल्या यशोगाथेचा वृत्तांता सांगताना आश्लेषा म्हणाल्या, “मी महिंद्रा अँड महिंद्रा या…

  • जनभागीदारीतून टीबी निर्मूलन शक्य — धाराशिवमध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन

    धाराशिव   /  प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय परिचारिका महाविद्यालय आणि जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टीबीमुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान होते,उपाध्यक्ष…

  • जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त भारतासाठी १०० दिवसीय मोहिमेला प्रारंभ

    धाराशिव   /  प्रतिनिधी  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त धाराशिव येथे टीबी मुक्त भारत अभियान २.० अंतर्गत १०० दिवसीय मोहिमेचे उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद स्थायी समिती सभागृहात उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील यांनी भूषविले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.मारोती कोरे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनय…

  • माजीमंत्री आ. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात २८ मार्चला भव्य कुस्ती महासंग्राम

    नामांकित मल्लांचा थरार रंगणार परंडा   /  प्रतिनिधी  महाराष्ट्राची परंपरा जपणारा अस्सल मातीतील कुस्ती हा खेळ पुन्हा एकदा परंडा नगरीत रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांच्यावतीने दि. २८ मार्च रोजी परंडा पंचायत समितीच्या प्रांगणात भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात…

  • जागरूक ग्राहकच फसवणुकीपासून सुरक्षित अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील

    धाराशिव   /  प्रतिनिधी  ग्राहक म्हणून वस्तू खरेदी करताना त्यावरील किंमत,दर्जा आणि एक्सपायरी तारीख तपासणे आवश्यक असून ग्राहक जागरूक असेल तर त्याची फसवणूक होणार नाही,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.यावेळी…

  • आळणीची लेक डॉक्टर बनली – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील आळणी गावासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे. गावातील विद्यमान सरपंच प्रमोद वीर यांची पुतणी तसेच वाशी येथील माजी सरपंच अरुण पापावीर यांची कन्या डॉ. दिव्या अरुण वीर यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.ग्रामीण भागातून येत असतानाही दिव्या यांनी अत्यंत जिद्द,…

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा – ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    धाराशिव / प्रतिनिधी रोजगार निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागातील तब्बल ४५ विद्यार्थ्यांची पुणे येथील एजिओ या नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत निवड झाली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच औषधनिर्माण (फार्मसी) क्षेत्रातही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापूर्वीही येथील विद्यार्थ्यांची रिलायन्स फार्मास्युटिकल, टीसीएस, वखार्ड,  श्रेया लाइफ सायन्स, एमक्युर, लुपिन,…