Live News…..Breaking News!

.

  • तुळजापुरात अद्यावत वातानुकूलित नाट्यगृह उभारणार !

    ‘पंचरंग करंडक’ एकांकिका लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन तुळजापुर / प्रतिनिधी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर शहराला लाभलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी, तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त असे पूर्णतः वातानुकूलित भव्य आणि अद्यावत नाट्यगृह उभारणार असल्याची अशी ग्वाही आमदार…

  • अँड. व्यंकटराव गुंड- पाटील यांना कट्टर हिंदुत्वाचे बाळकडू- कालीपुत्र कालीचरण महाराज   श्रीराम नवमी व चैत्र नवरात्री निमित्त भव्य देवी गोंधळ जल्लोषात साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात प्रथमच कालिपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम नवमी व चैत्र नवरात्री निमित्त भव्य देवी गोंधळ उत्सव व शिव तांडव स्तोत्र पठणाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी लेडीज क्लब मैदानावर अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या निनादात पारंपरिक मिरवणुकीने करण्यात आली. भव्य रॅलीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.…

  • क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमातून संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना –जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेंस प्रारंभ धाराशिव / प्रतिनिधी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना,शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून मुक्तता मिळून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २२ व २३ मार्च रोजी…

  • जगातील ५५ देशात हिंदू संस्कृतीचे दर्शन – विजयराव पुराणिकतुळजापुरात इंद्रायणी हिंदू संमेलन उत्साहात;

    तुळजापूर / प्रतिनिधी जगातील ५५ देशांमध्ये हिंदू संस्कृतीचे दर्शन घडते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील शंभर वर्षांत हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार अंगीकारुन समाजाच्या संघटनासाठी सातत्याने कार्य केले संघ शताब्दी वर्षात सर्वसामान्य नागरिकांनी ‘पंच परिवर्तन’ अंगीकारल्यास आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, असे प्रतिपादन सेवा भारतीचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी केले. येथील श्रीनाथ…

  • पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. मृदू व जलसंधारण विभाग धाराशिव व मृदू व…

  • अमरसिंह देशमुख यांना ‘ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र आणि धाराशिव येथील प्रसिद्ध ‘सन ग्रुप’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख यांना रविवारी पुण्यात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ‘ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा राज्यस्तरीय गौरव करण्यात आला आहे. पुणे येथील ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधववर शैक्षणिक…

  • श्रीराम नवमी निमीत्त धाराशिव मध्ये भाजपाकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन – दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, जिल्हा धाराशिव च्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये येत्या २६ तारखेला प्रभू श्रीरामांची जयंती जिल्ह्यामध्ये सर्वत्र भव्य शोभायात्रा आयोजित करून साजरी केली जाणार आहे.धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले आहे. प्रभू श्रीराम नवमी निमित्त धाराशिव…

  • बुकनवाडी जि.प. शाळेत गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम साजरा

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश वाढवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.साया उपक्रमात पालक, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष व महिलांचा समावेश होता. यानिमित्त शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त शाळेत संगीत खुर्ची,…

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन बळकटीवर भरजिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देणार – रवींद्र पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन मजबूत करण्यावर व कार्यकर्त्यांना संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर विशेष भर देण्यात आला. यावेळी पक्ष निरीक्षक रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाईल. संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाईल.”…

  • खेडच्या स्मिता शिंदेचे एमपीएससीत परीक्षेत यश; मंडल कृषी अधिकारी पदाला गवसणी

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत धाराशिव तालुक्यातील खेड येथील स्मिता जयंत शिंदे हिने उल्लेखनीय यश संपादन करत मंडल कृषी अधिकारी (वर्ग-२) पदाला गवसणी घातली आहे. तिने ४५० पैकी २९३ गुण मिळवत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात १७ वा क्रमांक पटकावला आहे. स्मिता शिंदे हिने यापूर्वीही एमपीएससी परीक्षेत मुलाखतीपर्यंत…