Live News…..Breaking News!

.

  • मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन येत्या रविवारी पळसप येथे संपन्न होणार

    धाराशिव   /  प्रतिनिधी स्वर्गीय अजितदादा पवार साहित्य नगरी पळसप तालुका धाराशिव येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने  २९ मार्च रोजी ११ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष,…

  • येडेश्वरीची चैत्र पौर्णिमा यात्रेची मंदिर देवस्थान कडुन जय्यत तयारी सुरु ;

    मंदीर रंगरंगोटीसह,साफ सफाई कामे , भाविकांसाठी मंडपाची कामे अंतिम टप्प्यात. येरमाळा  /   (तानाजी  बारकुल) महाराष्ट्रासह परराज्यात  तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील श्री.येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव येत्या २ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होतं असुन यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेला चुना वेचण्याचा कार्यक्रम, देवीच्या पालखीचे आमराई मंदिरात आगमन…

  • स्वातंत्र्य सैनिक कै.हरीश्चंद्रराव वाघमारे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुरात श्रीराम नवमीचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक कै. हरिश्चंद्रराव सदाशिवराव वाघमारे यांच्या स्मरणार्थ मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमास सौजन्य लाभले जनसेवक सुदर्शन (भैय्या) वाघमारे यांचे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मा. नगरसेवक अमर भैय्या मगर,मा. नगराध्यक्ष सुहास काका साळुंके, नगरसेवक अमोल भैय्या कुतवळ, नगरसेवक रणजीत भैय्या इंगळे, वल्लभ आप्पा कदम,…

  • धाराशिव शहरात श्रीराम नवमी निमीत्त भव्य शोभायात्रा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त जिल्ह्यातील विविध श्रीराम मंदिरामध्ये राम भक्तांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. जन्मोत्सव सोहळ्याचे व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात श्रीराम नवमी निमीत्त भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक…

  • उमरगा तालुक्यातील 119 स्वयं समूहाला 5 कोटी 32 लाख रुपयाचे कर्ज मंजुरी पत्र सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते वाटप

    मुरुम ( म. नेता ) उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती उमरगा वतीने व तालुक्यातील सर्व महाराष्ट्र ग्रामीण बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या तालुवयातील सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील 119 स्वयं समुहांना 5 कोटी 32 लक्ष रक्कमेचे समूहांला व वैयक्तिक योजनेतून उद्योग…

  • परंडा शहरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य शोभायात्रा

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हार दादा पाटील, जि.प. सदस्य धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करून या भव्य शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. हा क्षण केवळ रॅलीचा प्रारंभ नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा साक्षीदार ठरला. “जय श्रीराम” च्या गजरात संपूर्ण वातावरण…

  • हरित क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल : २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार

    — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव / प्रतिनिधी राज्याच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५” अंतर्गत २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाच्या वतीने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. सभागृहात नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मंत्री सरनाईक…

  • धाराशिव येथे आजपासून गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

    धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई शाखा धाराशिवच्या वतीने येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी शहरात ‘गंगाधर करंडक’, कलावंतांचा मेळावा आणि भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवार 27 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अखिल भारतीय…

  • नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटीसंवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘नळदुर्ग किल्ला संवर्धन आणि स्थळ व्यवस्थापन आराखडा’ या आराखड्यानंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तब्बल ७ कोटी १८ लाख ९१ हजार ७९१ रुपयांच्या निधीला मंजुरी…

  • तुळजापुरात तुळजाभवानी उत्पत्ती दिन साजरा

    तुळजापूर / प्रतिनिधी   श्री तुळजाभवानी उत्पत्ती दिन गुरुवार दि २६ रोजी  तुळजापुरात साजरा करण्यात आला. आज श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा उत्पत्ती दिन (प्रकट दिन)  निमित  देवीजीस  अभिषेक व महाआरती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी जनकल्याणासाठी देवीसमोर प्रार्थना करण्यात आली. प्रकट दिनानिमित्त महाद्वारासमोर भाविक भक्तांना…