प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखालील सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रेला प्रतिसाद. तुळजापूर / प्रतिनिधी शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उध्वस्त होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी…
धाराशिव / प्रतिनिधी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेश कार्यालयात धाराशिव नगरपरिषद येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नगरसेवकांचा गौरव करण्यात आला. यावेळी खलिफा कुरेशी, बबलू शेख, इस्माईल शेख, पंकज भोसले, एजाज काजी, सुनील आंबेकर, अशोक देवकते, विशाल शिंगाडे आणि…
तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा दिनांक ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चैत्र यात्रेची आवश्यक तयारी करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत ३१ मार्च, १ एप्रिल…
बिटविन द डोअर नाटकाने जिंकला गंगाधर करंडक धाराशिव / प्रतिनिधी नाट्यस्पर्धा ही केवळ जिंकणे-हरणे यापुरती मर्यादित नसून प्रत्येक स्पर्धकासाठी ती “जय-पराजयातून शिकण्याची” संधी असते. ती केवळ कला सादर करण्याची संधी देत नाही, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकदही देते. नाट्यस्पर्धा ही कलाकाराला घडवणारी शाळा असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत यांनी…
उमरगा / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र, आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिला. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन पाहणी केली, तेव्हा…
येरमाळा / तानाजी बारकुल येरमाळा येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पोर्णिमा यात्रात्सव दि. २ ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे. यात्रेतील चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी (दि. 03) होणार आहे. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने नुकतीच श्री. येडेश्वरी देवी चैत्र पोर्णिमा यात्रेची कार्यक्रम पत्रिका प्रकाशित केली आहे. तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीची…
परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या दि. 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डाँ . श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…
धाराशिव / प्रतिनिधी ‘ जिओ और जीने दो, भगवान महावीरजीके तत्त्वोंकी यही पुकार, युद्ध को दो अभी विराम’ अशा घोषणांच्या निनादात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने धाराशिव शहरात सोमवारी शानदार शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सकल जैन समाजाच्या वतीने…
अणदूर / प्रतिनिधी अणदूर येथील श्री खंडोबा पणन सहकारी संस्थेचे व्यवस्थापक दिगंबर मोळगडे यांचे सुपुत्र डॉ . दिनेश मोळगडे यांना नायर हॉस्पिटल मुंबई येथे डीएम स्पेशालिटी न्यूरोलॉजी करीता प्रवेश निश्चित झाला आहे . विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्यात एकूण चार जागा असून एक जागा डॉ . दिनेश यांनी हस्तगत केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च डीएम…
धाराशिव / प्रतिनिधी नाटकामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. विविध अनुभवांमुळे माणूस अधिक समजूतदार आणि सहानुभूतीशील बनतो. त्यामुळे नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारे एक महत्त्वाचे कला माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके यांनी केले. धाराशिव शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आयोजित राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे…