Live News…..Breaking News!

.

  • श्री तुळजाभवानी देवी चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी व्यापक तयारी; स्वच्छता व सुरक्षेवर भर

    तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा दिनांक ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चैत्र यात्रेची आवश्यक तयारी करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत ३१ मार्च, १ एप्रिल…

  • नाट्यस्पर्धा  कलाकाराला घडवणारी शाळा – नीलिमा शिर्के-सामंत राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेस कलावंत आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद 

    बिटविन द डोअर नाटकाने जिंकला गंगाधर करंडक धाराशिव / प्रतिनिधी नाट्यस्पर्धा ही केवळ जिंकणे-हरणे यापुरती मर्यादित नसून प्रत्येक स्पर्धकासाठी ती “जय-पराजयातून शिकण्याची” संधी असते. ती केवळ कला सादर करण्याची संधी देत नाही, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकदही देते. नाट्यस्पर्धा ही कलाकाराला घडवणारी शाळा असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत यांनी…

  • उमरगा व लोहारा तालुक्यातील आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई गायकवाड यांच्याकडून अचानक भेट

    उमरगा‌ / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र, आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिला. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन पाहणी केली, तेव्हा…

  • येडेश्वरी देवीची यात्रा गुरुवार पासुन.येरमाळ्यात पर्वणी – चुना वेचण्याचा कार्यक्रम ३ एप्रिलला

    येरमाळा / तानाजी बारकुल येरमाळा येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पोर्णिमा यात्रात्सव दि. २ ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे. यात्रेतील चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी (दि. 03) होणार आहे. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने नुकतीच श्री. येडेश्वरी देवी चैत्र पोर्णिमा यात्रेची कार्यक्रम पत्रिका प्रकाशित केली आहे. तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीची…

  • चिंचपूर बु. येथे परंडा भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न

    परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या दि. 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डाँ . श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…

  • धाराशिव येथे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शानदार शोभायात्राएकात्मता जोपासण्याच्या मुलांच्या नृत्याने वेधले लक्ष

    धाराशिव / प्रतिनिधी ‘ जिओ और जीने दो, भगवान महावीरजीके तत्त्वोंकी यही पुकार, युद्ध को दो अभी विराम’ अशा घोषणांच्या निनादात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने धाराशिव शहरात सोमवारी शानदार शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सकल जैन समाजाच्या वतीने…

  • डॉ. दिनेश मोळगडे यांना न्यूरोलॉजिस्ट पदवीसाठी प्रवेश.

    अणदूर   /   प्रतिनिधी अणदूर येथील श्री खंडोबा पणन सहकारी संस्थेचे व्यवस्थापक दिगंबर मोळगडे यांचे सुपुत्र डॉ . दिनेश मोळगडे यांना  नायर हॉस्पिटल मुंबई येथे डीएम स्पेशालिटी न्यूरोलॉजी करीता प्रवेश निश्चित झाला आहे . विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या  राज्यात एकूण चार जागा असून एक जागा डॉ . दिनेश यांनी हस्तगत  केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील  सर्वोच्च डीएम…

  • नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारे माध्यम – नितीन दंडुकेराज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेचा शुभारंभ 

    धाराशिव   /  प्रतिनिधी  नाटकामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. विविध अनुभवांमुळे माणूस अधिक समजूतदार आणि सहानुभूतीशील बनतो. त्यामुळे नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारे एक महत्त्वाचे कला माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके यांनी केले. धाराशिव शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आयोजित राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे…

  • कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल १००० रुपयांचे अनुदान द्या – डॉ. प्रतापसिंह पाटील

    धाराशिव   /  प्रतिनिधी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल १००० रुपये अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कांद्याच्या लागवडीसाठी लागणारे बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी तसेच…

  • ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दादसह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित

    धाराशिव    /  प्रतिनिधी  राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या…