Live News…..Breaking News!

.

  • परंडा येथे रातोरात बसवला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा* आंबेडकर प्रेमी व बहुजन समाज बांधवांकडून जल्लोषात स्वागत

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानंतर रातोरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पुतळा बसवण्यात आला. दिनांक 10 एप्रिल, शुक्रवार रोजी परंडा शहरवासियांना सकाळी झोपेतून उठताच एक सुखद धक्का बसला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन झाले. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सकाळी बार्शी रोडवरील आंबेडकर…

  • ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत धाराशिव अव्वल ठरणार – जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा निर्धार

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृह,एम.आय.टी. इंजिनीअरिंग कॉलेज येथे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री…

  • कुटुंब प्रबोधन, स्वबोध, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण – पंचसूत्रीतुन समाज परिवर्तनावर भर

     – राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल धाराशिव / प्रतिनिधी कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण ,स्वबोध या पंचसूत्रीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षात भर असुन या पंचसूत्रीतुन समाज परिवर्तन करण्यासाठी संघ काम करणार आहे. भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक मुल्ये जोपासणे गरजेचे आहे. संस्कारमय, राष्ट्रभक्त आणि सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारी पिढी घडवण्याची सर्वांची…

  • कळंबकरांना दिलासा! चार वर्षांपासून बंद असलेला ‘मराठवाडा शुद्ध जल एटीएम’ उपक्रम पुन्हा सुरू; आता शुद्ध पाणी थेट घरापर्यंत

    कळंब / प्रतिनिधी नगरपरिषद कळंबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आणि गेल्या चार वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा “मराठवाडा शुद्ध जल एटीएम मॉडेल” उपक्रमाला अखेर नवसंजीवनी मिळाली आहे. नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आता अधिक सक्षमपणे, थेट गाडीद्वारे घरापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या सुविधेसह पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. “स्वच्छ…

  • ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र – शिवसेना (उबाठा )प्रवक्ते तानाजी जाधवर

    धाराशिव / प्रतिनिधी एखादा योद्धा कसाही करुन पराभूत होत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची प्रतिमेबाबत लोकामध्ये सभ्रम तयार केला जातो असाच काहीसा प्रकार सद्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीत अगदी नियोजनबद्ध केला जात आहे. पक्ष बदलाची चर्चा म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याच मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी…

  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जिल्हा कार्यकारणीवर सरपंच रामचंद्र आलूरे यांची निवड

    अणदूर. ( म.नेता ) अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई ही संस्था सर्वोत्तम सेवा संघ असून धाराशिव जिल्हा कार्यकारिणीवर अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.या संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, उपाध्यक्ष अरुण गुजराती, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, सरचिटणीस हेमंत टकले, कोषाध्यक्ष…

  • रवी रमेश ठेंगल यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शप) ओबीसी सेल धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड 

    धाराशिव / प्रतिनिधी येथील धडाडीचे युवक कार्यकर्ते रवी रमेश ठेंगल यांची राष्ट्रवादी पक्ष कार्यालय,मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.राज राजापुरकर,ॲड योगेश सोन्नेपाटील तसेच लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.पक्षाची धेय धोरणे समाजातील सर्व घटकांपर्यंत तसेच…

  • सीईओ महाडदळकर यांचा शिक्षक संघाकडून सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांचा अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व मागण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली. यामध्ये पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठ शिक्षकांना आधी संधी देऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशानुसार नैसर्गिक न्यायाने प्रक्रिया राबवावी यासह इतर अन्य मागण्या राज्य उपाध्यक्ष…

  • निरोगी समाजासाठी प्रत्येक घटकाचे सामूहिक प्रयत्न आवश्यक — श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर

    जागतिक आरोग्य दिनी आरोग्य योजनाचा आढावा धाराशिव / प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथे कार्यकारी समितीची बैठक घेऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला.या बैठकीत आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली.७ एप्रिल १९४८…

  • आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार –आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याअनुषंगानें तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.प्रशासनाने याचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, आंब्याच्या मोहोराची मोठी गळ झाल्याने त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याला…