Live News…..Breaking News!

.

  • पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखला गेला पाहिजे.पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेने आणि व्रतस्थ भावनेने पार पाडले जाते.त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद,धाराशिव येथे दैनिक ‘पुण्य नगरी’च्या २५ व्या…

  • तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या यात्रेसाठी राज्यभरातून दिंडयांचे आगमन

    तेर / गोरख माळी धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस १२ एप्रिल पासून प्रारंभ झाला असून राज्यभरातून वारकरी दिंडयांचे तेर येथे आगमन झाले आहे. तेर येथे यात्रेनिमित्त आलेल्या दिंडयांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यानी स्वागत केले.श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे-बारवडे यांनी सांगितले की, यात्रेसाठी…

  • धाराशिवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

    धाराशिव / प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९व्या जयंतीनिमित्त आज धाराशिव शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील महात्मा फुले चौक येथे आयोजित कार्यक्रमात धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन…

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर!नगराध्यक्षा सौ नेहाताई काकडे यांनी धाराशिवसियांच्या वतीने मानले धन्यवाद

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या’ दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ नेहाताई…

  • तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती व डाँ पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कलामंच संस्थेस जीवन गौरव पुरस्कार जाहीर

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर येथील तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती व डॉ पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कला मंच तुळजापूर या संस्थेनी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग व्हावा व आई तुळजाभवानी चे तीर्थक्षेत्र तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशा वरती यावे म्हणून सातत्याने 2006 सातत्याने संघर्ष समितीच्या माध्यमातून विविध आंदोलने करून 25 वर्ष लढा देणाऱ्या व संघर्ष…

  • तुळजापुरात आज रक्तदान शिबिराचे आयोजन

    तुळजापूर / प्रतिनिधी येथील न.प.प्रा. शाळा क्र.१चे माजी मुख्याध्यापक कै. दिगंबरराव कावरे गुरुजी यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त क्रांती लॉज भवानी रोड येथे सोमवार दि. १३ एप्रील रोजी दुपारी ५ ते रात्री ८:३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा…

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात आज रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुरस्काराचे वितरण व शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेनेचे इतर मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित राहिले होते. दरम्यान या दौऱ्यापूर्वीच आज रविवारी सकाळीच जिल्हा परिषद व नगरपालिका…

  • उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी ; महसूल वसुलीत ११४.५७ टक्के उद्दिष्टपूर्ती

    धाराशिव / प्रतिनिधी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार ११४.५७ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल वसुली करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कालावधीत कार्यालयाने केलेल्या विविध कामगिरीचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.आर्थिक वर्ष २०२५ -२६ मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी तब्बल…

  • महिलांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ राहणे ही काळाची गरज — जि.प.अध्यक्षा अर्चना पाटीलसामाजिक समता सप्ताह

    धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व…

  • धाराशिव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१२) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध बक्षिसे व पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, रोहयो मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक…