Live News…..Breaking News!

.

  • येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांना ग्राहक समिती तर्फे फळे वाटप.

    येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथे चैत्र पोर्णिमा दिवशी येडेश्वरी देवीची यात्रा पार पडली. यात्रेनिमीत्त ग्राहक समिती येरमाळा जि. धाराशिव यांंच्याकडून येडेश्वरी देवीला येणाऱ्या भाविकांना केळीचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल भाविकांनी आशिर्वाद देऊन या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून आनंद व्यक्त केला. यापुढे याही पेक्षा चांगला सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजीराव…

  • पाणीपुरवठा सुरळीत करता येत नसेल तर पाणीपुरवठा सभापतींनी राजीनामा द्यावा’ – नगराध्यक्ष जाकिर सौदागरपरंडा शहरात पाणी पुरवठयावरुन आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण

    परंडा / प्रतिनिधी परंडा नगरपालिकेत शिवसेनेचे(शिंदे गट) आठ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष, तर जनशक्ती शहर विकास आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. नगरपालिका सभागृहात महाविकास आघाडीचे बहुमत आहे.परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांतील पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

  • “जय जगदंब” कॉफीटेबल पुस्तकाचा तुळजापूरात भव्य प्रकाशन सोहळा;माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण , आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर येथील उपाध्ये श्रीकृष्ण दीक्षित यांनी लिहिलेल्या व संकलित केलेल्या “जय जगदंब” या कॉफीटेबल पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते, तर या सोहळयाचे अध्यक्षस्थान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भूषविले. या कार्यक्रमाला आमदार सतीश…

  • प्रदेश युवक कॉग्रेसच्या महासचिवपदी अभिजित चव्हाण यांची फेरनिवड

    नळदुर्ग / प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या प्रदेश कार्यकारणीत अभिजीत चव्हाण यांची प्रदेश महासचिव म्हणून महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली 130 जनाच्या या कार्यकारणीत प्रदेश महासचिव पदी निवड झालेल्या अभिजीत चव्हाण यांनी संघटनेत तळागाळातून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या…

  • लाखो भाविकांनी टेकवला ज्योतिबा चरणी माथा

    ईट / प्रतिनिधी भूम तालुक्यातील बालाघाटाच्या डोंगरावर बसलेल्या ज्योतिबाचीवाडी येथील श्री ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या श्री ज्योतिबाचे अधिष्ठान म्हणून या देवस्थानची ओळख आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे श्री ज्योतिबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते . प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने विविध भक्तिमय कार्यक्रम , कुस्तीची दंगल व लेझीम पथक मुख्य आकर्षण पालखी…

  • अवकाळी च्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी – माजी मंत्री आमदार सावंत यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

    परंडा / प्रतिनि परंडा विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे प्रशासनाने करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले…

  • जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते येरमाळा यात्रेतील पशु प्रदर्शनाचे उद्घाटनप्रदर्शनास चांगला प्रतिसाद

    येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सवाचा कालचा तिसरा दिवस होता. दि. ०४ रोजी शनिवारी दुपारी १२ वाजता अंबराई परिसरामध्ये पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ., या पशु प्रदर्शानामध्ये येरमाळा व…

  • महापुरुषांच्या पुतळ्यांवरील चर्चेसाठी ८ एप्रिलला परंडा पालिकेची सभा – नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांची माहिती

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या प्रस्तावासंदर्भात ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर ८ एप्रिल २०२६ रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सखोल चर्चा होणार आहे. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२:३० वाजता होणाऱ्या या बैठकीत परंडा शहराच्या सौंदर्यीकरणा…

  • जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी घेतली भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेटठाकूर यांच्या हस्ते सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद, धाराशिव च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे आज सदिच्छा भेट देऊन भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी श्री ठाकूर यांनी अर्चनाताई पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सरचिटणीस धनाजी…

  • येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

    पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्री पालखी सोहळा ‘आई राजा उदे उदे… येडासरीचा उदे उदे’च्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार राणाजगजितसिंह…