धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याची ओळख आता केवळ दुष्काळी जिल्हा म्हणून न राहता ‘ऊर्जा हब’ म्हणून विकसित होत आहे. जिल्ह्यात सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे १० हजार कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक होत असताना, या कंपन्यांनी आता केवळ नफा न कमवता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात वाटा उचलणे अनिवार्य आहे. कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी आता केवळ कांही…
धाराशिव / प्रतिनिधी अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून ५९ प्रवर्गांमध्ये फूट पाडण्याचा राज्य सरकारचा डाव असून, हा निर्णय समाजहिताच्या विरोधात असल्याचा घणाघाती आरोप आमदार प्रवीण स्वामी यांनी केला. या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यात येणार असून, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ठाम भूमिका मांडली जाईल. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,…
लोहारा / प्रतिनिधी लोहारा तालुका आढावा बैठकीच्या निमित्ताने धाराशिव जि.प. च्या अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचे दि.7 मे 2026 रोजी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच लोहारा तालुका भाजपाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करुन स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्या तथा सरपंच सौ.शितलताई…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.तुळजापूर,उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सात पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. उपकार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.२,उमरगा यांच्या…
महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनी, प्लॉट आणि घरांच्या वर्ग-१ प्रक्रियेत महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या कथित अडवणुकीविरोधात शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक झाले आहेत. हजारो प्रकरणे प्रलंबित राहिल्याने जमीन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर…
धाराशिव / प्रतिनिधी ग्रामीण महिलांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या कृषी व्यवसायाला आता जागतिक स्तरावरही दाद मिळू लागली आहे.माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील ‘धारासूरमर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’च्या कार्याचे जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले.कंपनीला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ.व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगररोड, धाराशिव येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “फार्मा दशोध्याय 2026” हा बहुआयामी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम आणि कवी तथा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेला जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या रस्त्यावरील अपूर्ण व निष्काळजी कामामुळे आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपले वाद सामोपचाराने निकाली काढावेत,असे आवाहन करण्यात आले आहे. या लोकअदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण…
धाराशिव / प्रतिनिधी सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री श्री.प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून…