धाराशिव / प्रतिनिधी माजीमंत्री, आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 48 वा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि.10 मे) धाराशिव येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 11 हिंदू जोडपी विवाहबंधनात अडकली. विवाह सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष…
धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक, विश्व हिंदू परिषद – बजरंग दल धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तसेच रुपामाता फाऊंडेशनचे सचिव मा. अॅड. अजित (दादा) गुंड पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अंकुर शिशुगृह, मातोश्री वृद्धाश्रम व बाल सुधारगृह येथे अन्नधान्य, किराणा साहित्य, दुध पावडर तसेच फळांचे वाटप…
धाराशिव / प्रतिनिधी नळदुर्ग पोलिस ठाणे येथील 10 कोटी हाशिश ऑईल तस्करी गुन्ह्यातील आरोपीस ओडीसा राज्यातील अतिशय दुर्गम नक्षलग्रस्त भागातुन पकडण्याची धाडसी मोहिम धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 19.04.2026 रोजी रात्री नाकाबंदी दरम्यान नळदुर्ग पोलीसांना पाहुन अमंली पदार्थ तस्करी करणारे आरोपी त्यांचे ताब्यातील हशिश ऑईल…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत धाराशिव च्या तहसिलदार डाँ मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली ता. धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये विविध महसुली व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. शिबिरात विविध योजनांअंतर्गत एकूण 914 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी…
लोहारा / प्रतिनिधी लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश…
धाराशिव / प्रतिनिधी खेळाडूंनी केवळ मैदानावरील सरावावर भर न देता आपल्या दैनंदिन आहाराकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य आणि संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, सहनशक्ती वाढते आणि खेळातील कामगिरी अधिक प्रभावी होते, असे प्रतिपादन डॉ. प्रियंका चौरे यांनी केले. धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने धाराशिव येथील डायट कॉलेज मधील आर्चरी प्रशिक्षण केंद्रामध्ये…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर ता. धाराशिव या शाळेने दहावी परीक्षेच्या निकालात सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे प्रशालेने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश मिळविले. यंदाच्या निकालात कु. सुषमा अण्णासाहेब मोरे हिने ९० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक…
तुळजापुर / प्रतिनिधी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या भाविकांना सुलभ, सुरक्षित व सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आज गुरुवारी सकाळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मंदिर संस्थानचा सुरक्षा विभाग, स्वच्छता विभाग, तुळजापूर नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान महाद्वार रोड, भवानी रोडसह मंदिराकडे जाणाऱ्या तिन्ही…
धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बार्बर (सलून) प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला.आज ७ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास विविध विभागांतील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या…
धाराशिव / प्रतिनिधी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 47 वा सामुदायिक विवाह सोहळा 10 मे 2026 रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे. लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह…