Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव केंद्रावर वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा (NEET) (UG)-२०२६ शांततेत व यशस्वीरीत्या संपन्न१८४५ विद्यार्थ्यांची उपस्थिती

    धाराशिव   /  प्रतिनिधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी,नवी दिल्ली यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा NEET (UG)-२ ०२६ आज रविवारी,३ मे रोजी धाराशिव येथील केंद्रावर अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडली.दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत,तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण पाच उपकेंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या…

  • धाराशिवमध्ये ५ मे रोजी ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’चा धमाकाछत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रात्री ८ वाजता प्रयोग; रसिकांनी लाभ घ्यावा – विशाल शिंगाडे

    धाराशिव   /  प्रतिनिधी विनोद, कौटुंबिक नातेसंबंध आणि हलक्या- फुलक्या मनोरंजनाची मेजवानी ठरणारे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गाजणारे  ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे गाजलेले मराठी नाटक येत्या ५ मे रोजी धाराशिवमध्ये रंगणार आहे. या नाटकाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा धाराशिव यांच्यावतीने करण्यात आले आहे. या नाटकाचा प्रयोग ५ मे रोजी रात्री ८:०० वाजता छत्रपती शिवाजी…

  • गोवंश हत्या, लव्ह व लँड जिहाद – धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याची गरज –हर्षाताई ठाकूर यांचे प्रतिपादन

    धाराशिव   /  प्रतिनिधी गोवंश हत्या, लव आणि लँड जिहाद, धर्मांतर यासारख्या हिंदू धर्मावर येणाऱ्या आपत्ती थांबवण्यासाठी हिंदू समाजाने आता जागृत होऊन संघटित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या हर्षाताई ठाकूर यांनी केले. त्या धाराशिव येथे सकल हिंदू समाज आयोजित हिंदू जागृती मेळाव्यात बोलत होत्या.  धाराशिव येथे जय भवानी हिंदु संमेलन समितीच्या वतीने विराट हिंदू संमेलन…

  • महापुराच्या संकटावर मात करत स्नेहल सुळ चे बारावी परीक्षेत प्रेरणादायी यश

    परांडा   /  प्रतिनिधी वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परांडा येथील विद्यार्थिनी स्नेहल सुळ हिने एचएससी  बारावी बोर्ड परीक्षेमध्ये 78.67% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल आणि हृदयद्रावक परिस्थितीतून मार्ग काढत तिने मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्नेहलचे वडील शेतकरी असून कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. काही महिन्यांपूर्वी परांडा तालुक्यात…

  • कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन

    खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव / प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अनेक शेतकरी आजही योजनांपासून वंचित आहेत.त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून योजनांची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. जिल्हा नियोजन…

  • आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहने पालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक वाहनांचे पूजन व लोकार्पण १ मे रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण…

  • बारावीच्या निकालात धाराशिव जिल्हा लातूर विभागात व्दितीयजिल्हयाचा निकाल 88.59%मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत फेब्रुवारी/मार्च 2026 घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी चा निकाल आज रोजी घोषित करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 88.59 टक्के लागलेला आहे. लातूर विभागामध्ये धाराशिव जिल्ह्याचा व्दितीय क्रमांक आलेला आहे. जिल्हयात १२ वी परीक्षेसाठी एकूण 15715 विद्यार्थी या परीक्षे…

  • सुनिल पवार भोत्रेकर यांचा चिंचवड येथे समाजगौरव पुरस्काराने सन्मान

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोत्रा गाऺवाचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते सुनिल दिगंबर पवार यांना 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 चा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवीभाऊ लाऺडगे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, गृह मंत्रालय विभागाचे अधिकारी यशवंतराव…

  • संत आणि शिवरायांचे विचार समाजात रुजवा हिंदू संमेलनात हभप. संभाजी महाराज साळुंखे यांचे मत

    धाराशिव / प्रतिनिधी सध्याच्या तरुण पिढींमध्ये संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळेच समाजातील हिंदू मुली, महिला आणि समाजावर संकटे येत असल्याची खंत समाजमनात आहे. समाजाने वेळीच जागरूक होऊन आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले तर पुन्हा शिवछत्रपतींचे स्वराज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असे मत हभप.  संभाजी महाराज साळुंखे…

  • भाजपच्या नव उद्योजक’ उपक्रमाला वाढता प्रतिसादअर्जांची छाननी सुरू, आठवडाभरात निवड प्रकिया – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती जिल्ह्यातील तरुणांच्या हातांना काम मिळावे आणि त्यांनी स्वतःचे उद्योग उभे करावेत, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेल्या ‘१०८ नवे उद्योजक’ या उपक्रमाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल ६७० इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी आणखी सात ते आठ दिवसांचा अवधी…