Live News…..Breaking News!

.

  • नीलकंठेश्वर मठाच्या अभूतपूर्व पट्टाभिषेक महोत्सवाचा लाभ घ्या – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

    अणदूर ( म. नेता. ) सध्याच्या या संघर्षमय जीवनात खऱ्या अर्थाने आध्यात्मिकता ही काळाची गरज असून, आदर्श समाज निर्मितीसाठी चांगल्या विचाराची गरज आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून धार्मिक विविध कार्यक्रमातून नव्या पिढींना आदर्श विभूतींचा आशिर्वाद व विचारांची प्रेरणा देणार असल्याचे सांगून नीलकंठेश्वर मठाचा रौप्यमहोत्सव व शिवयोगी शिवाचार्य महास्वामींचा पट्टाभिषेक महोत्सवाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी…

  • कांदा उत्पादकांना तातडीचा दिलासा देऊन पर्यायी पीक धोरण राबवावे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले असून त्यांना तातडीने दिलासा देण्याबरोबरच पर्यायी पीक धोरण राबविण्याची आवश्यकता असल्याची मागणी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवून आपल्या भावना कळविल्या आहेत. राज्यात वाढते तापमान, अवकाळी पाऊस, वादळे आणि बाजारातील घसरलेले दर यामुळे कांदा…

  • कै. रावसाहेब पाटील विद्यालय ,परंडा दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

    परंडा / प्रतिनिधी कै. रावसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय परंडा येथील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा 80 .77%निकाल लागला असून विद्यालयामधून प्रथम क्रमांकाने श्रेयश भारत धेंडे- 70.40% गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. कु. सादिका सुभाष मेहेर – 68 .20%. या मुलीचा द्वितीय क्रमांक आला आहे. कु. सृष्टी अशोक अडसूळ – 67.20% हिचा तृतीय क्रमांक आला आहे.…

  • मुरुम येथील डॉ ज़ाकिर हुसैन ऊर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के निकलात मुली‌च अव्वल

    मुरुम ( म. नेता ) मुरूम येथील डॉ ज़ाकिर हुसैन एजुकेशन सोसायटी संचलित डॉ ज़ाकिर हुसैन उर्दू हायस्कूलचा एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे. गेल्या आठ वर्षांपासूनची निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे. शाळेतील लोनी सदफ महरीन महबूब या विद्यार्थिनीने 80.00 टक्के गुण मिळवत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.ढोबळे तनसिफा तनवीर या विद्यार्थिनींनी 79.60 टक्के…

  • नळदुर्ग पालिकेचा स्वच्छतेता ठेका रद्द करण्याची काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणीविभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहरातील घनकचरा संकलन कामातील गंभीर अनियमितता व कामगारांच्या सुरक्षेबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी लक्षदेत नाहीत यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सदर ठेकेदाराचे टेंडर रद्द करून त्यावर कारवाईची मागणी नळदुर्ग नगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे केली आहे. याबाबत दि. ११ मे २०२६रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस…

  • आंतरराष्ट्रीय खो-खो प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशांत पवा⁹र यांची तज्ञ तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती

    धाराशिव / प्रतिनिधी ऑलम्पिक कौन्सिल, आंतरराष्ट्रीय खो-खो फेडरेशन व एशियन खो-खो फेडरेशन संलग्नता प्राप्त खो-खो इंडिया यांच्या मान्यतेने नेपाळ खो-खो असोसिएशन यांच्यावतीने दिनांक 13 ते 16 मे 2026 या कालावधीत कवरडेड हॉल, कीर्तीपूर, काठमांडू (नेपाळ) येथे लेव्हल-1 प्रशिक्षण शिबिर व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती बिभिषण पाटील यांनी दिली . या प्रशिक्षण शिबिरात…

  • नळदुर्गच्या मेमोरियल उर्दू शाळेचा ९८ टक्के निकाल

    नळदुर्ग / प्रतिनिधी येथील सय्यद अब्दुल्ला शाह मेमोरियल उर्दू माध्यमिक शाळेत दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नळदुर्ग शहरातील सय्यद अब्दुल्ला मेमोरियल उर्दू माध्यमिक शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. ​त्यामध्ये विशेष प्राविण्य १४, प्रथम श्रेणीत २२, द्वितीय श्रेणी १५ असे ५१…

  • तेजस्विनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे . यामध्ये विविध शाळांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले. अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. प्रसाद कॉलनी माणिक चौक धाराशिव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तेजस्विनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा…

  • 2020 पिक विमा प्रकरण – सरकारच्या कंपनी धार्जिण भूमिकेमुळे शेतकऱ्याचे विम्या बाबतीत मोठे आर्थिक नुकसान – आ. कैलास पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांपासून 2020चा खरीप पीक विमा न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयात विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेले 75 कोटी व त्यावरील व्याज असे एकूण 93 कोटी रुपये;तसेच राज्य शासनाकडील हप्त्याचे 134 कोटी रुपये अशा एकूण 227 कोटी रुपयांचे वितरण पात्र शेतकऱ्यांना…

  • ठाकरे सरकारचे ‘पाप’; कैलास पाटलांचा कांगावास्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी शेतकरी हिताची नौटंकी -ऍड नितीन भोसले

    धाराशिव / प्रतिनिधी सन २०२० च्या खरीप पीकविम्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी तब्बल सहा वर्षांपासून न्यायासाठी वणवण भटकत असताना, आता अचानक शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा आव आणणारे आमदार कैलास पाटील हे केवळ राजकीय नौटंकी करत आहेत. प्रत्यक्षात २०२० आणि २०२१ चा पीकविमा रखडण्यामागे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची विमा कंपन्यांप्रती असलेली संशयास्पद मवाळ भूमिका कारणीभूत होती, ठाकरे सरकारचे…