Live News…..Breaking News!

.

  • गावजेवण देऊन मुलीच्या जन्माचे स्वागत परंडा तालुक्यातील खासापुरी गावच्या जमदाडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

    मुलीचा नामकरण सोहळाही मोठ्या थाटामाटात संपन्न परंडा / प्रतिनिधी आजच्या आधुनिक युगात समाजात मुलगा-मुलगी समानतेचा संदेश दिला जात असताना, परंडा तालुक्यातील खासापुरी येथील जमदाडे परिवाराने मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मुलीच्या जन्मानिमित्त संपूर्ण गावाला गाव जेवण देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच चिमुकलीच्या नामकरण सोहळ्याचे मोठ्या थाटामाटात आयोजन…

  • जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

    धाराशिव / प्रतिनिधी सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव जिल्ह्यासाठी ८४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटर केरोसिनचे तालुकानिहाय वाटप अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ…

  • रुपामाता फाऊंडेशनचा उपक्रम; परिचारकांच्या सेवेला कृतज्ञ अभिवादन

    धाराशिव / प्रतिनिधी जागतिक परिचारक दिनानिमित्त समर्थ नगर येथील इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलमध्ये रुपामाता फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षित विद्यार्थी परिचारकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आधुनिक परिच-या सेवेच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान परिचर्या क्षेत्रातील सेवाभाव, समर्पण आणि मानवतेची जपणूक करणाऱ्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. विशेषतः कोरोना…

  • नळदुर्ग पालिकेच्या वृक्ष लागवडची चौकशी करण्याची काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगर परिषदेमधील “हरित धाराशिव 2025” अंतर्गत वृक्षारोपण करताना भ्रष्टाचारा करण्यात आला असुन त्याची चौकशी करण्यात यावी व दोषीवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे नळदुर्ग पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. नळदुर्ग नगर परिषदेमध्ये “हरित धाराशिव 2025” अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामामध्ये मोठ्या…

  • दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा… ‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट*

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिवच्या मातीत दुष्काळ नवा नाही…उन्हाळ्याची चाहूल लागली की गावागावातील विहिरींचा तळ दिसू लागतो, बोअरवेल कोरड्या पडतात,टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटू लागतात.आकाशात ढग दाटले तरी पाऊस हमखास पडेल याची शाश्वती उरलेली नाही.बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वर्षानुवर्षे घटत चाललेली भूजल पातळी यामुळे धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्यासमोर जलसंकट…

  • जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा एकमुखी निर्णय – जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटीलनळाला पाणी नाही तर गुत्तेदाराला पैसे ही नाहीत

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वःमालकीच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून कब्जा मिळवलेला आहे. त्यावर बांधकाम देखील करून ते भाड्याने दिलेले आहे. ते अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. विशेष म्हणजे धाराशिव येथील कन्या प्रशालेसमोरीर जिल्हा परिषदेचे गाळे बांधलेले असून त्यामध्ये असलेल्या गाळेदाराकडे लाखो रुपयांची थकबाकी ळस कोटयांवधी…

  • जिल्हा परिषद शाळेतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते – उपसभापती प्रमोद पाटील

    वडगाव ( सि ) जि. प. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार धाराशिव / प्रतिनिधी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळेच आज शैक्षणिक स्पर्धेच्या युगात देखील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. शासनाने देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांना चांगले…

  • मुरूममध्ये शुक्रवारी ‘महाराजस्व समाधान’ शिबिराचे आयोजन​ प्रलंबित महसूल प्रश्नांचा जागेवरच निपटारा होणार

    मुरूम ( म. नेता ) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर (अभियान टप्पा क्र. १) चे आयोजन उमरगा तहसिल कार्यालयांतर्गत मुरूम येथे करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी सकाळी १० – ०० वाजता जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची), मुरूम येथे संपन्न होईल. ​सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी…

  • तेर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरावस्था

    तेर ( म. नेता ) पर्यटक, अभ्यासक, भाविक भक्त यांची रहाण्याची सोय व्हावी म्हणून 1992 ला बांधण्यात आलेले धाराशिव तालुक्यातील तेर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाला उकीरडयाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे 1992 ला पर्यटक, अभ्यासक यांना रहाण्याची सोय व्हावी म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने विश्रामगृह बांधण्यात आले.या विश्रामगृहात दुसऱ्या मजल्यावर एक व्हीआयपी खोली…

  • जलजीवन मिशनची टाकी घाणीने भरली घट्टेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात

    तुळजापूर / प्रतिनिधी ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली पाण्याची टाकीच आता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काटगाव येथील घट्टेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असून, टाकीची स्वच्छता गेल्या दीड वर्षांपासून करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील आडगाव…