Live News…..Breaking News!

.

  • परंडा शहरातील मंडई पेठ किल्ला परिसरात अतिक्रमणाविरुद्ध नगर परिषदेची धडक कारवाईअतिक्रमणामुळे झाकाळलेला मंडई परिसर झाला खुला .

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील किल्ला परिसर मंडई पेठ चौक परिसरात परंडा नगर परिषदेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई करत या भागातील व्यवसायिक पान टपऱ्या छोटे मोठे बांधकाम बुलडोजर च्या साह्याने जमीन दोस्त केले .कारवाईदरम्यान अतिक्रमण धारक व अधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली विरोध जुगारून अखेर ही कारवाई पूर्ण केली असल्याचे दिसून आले…

  • व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील  कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा; आयसीआयसीआय बँकेत दोन विद्यार्थ्यांची निवड

    धाराशिव / प्रतिनिधी व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत नामांकित आयसीआयसीआय बँकेत निवड मिळवली आहे. महाविद्यालयात आयसीआयसीआय बँकेचा कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, आयसीआयसीआय बँकेचा २०२६ सालातील हा पहिलाच कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम ठरला.या प्लेसमेंट प्रक्रियेत महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेत सहभाग नोंदवला होता.…

  • जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

    धाराशिव / प्रतिनिधी जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे. जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर सूचीकरणाची आवश्यक ती नोंद पूर्ण केली जाणार आहे.तसेच काही कारणास्तव…

  • अणदूर – खुदावाडी रस्त्याची अक्षरशः चाळण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

    अणदूर ( म.नेता. ) तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर लगत असलेल्या अणदूर – खुदावाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वनवास कधी संपणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ व वाहनधारकांतून ऐकावयास मिळत आहे त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ व प्रवाश्यांकडून रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. संपूर्ण राज्यात संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम…

  • लिलाताई जळगावकर पुरस्कार तालयोगी पंडीत सुरेश तळवलकर यांना प्रदान

    धाराशिव / प्रतिनिधी शनिवार संगीत मंडळ व सर्वेश इव्हेंट्स यांच्यावतीने सौ. लीलाताई जळगावकर पुरस्कार तालयोगी पंडीत सुरेश तळवलकर यांना शाल , श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण जोशी, पद्मश्री पंडीत उल्हास कशाळकर, विजय घाटे, मंडळाचे सदस्य हनुमंत फडतरे, अरुण समुद्रे,भागवत कुंभार, पी. डी. देशपांडे, वैशाली धर्म, अभय निलंगेकर, धनंजय देशपांडे आदिसह मोठ्या…

  • ‘एल-निनो’च्या संकटावर मात करण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाचा अवलंब करा पावसाचा प्रत्येक थेंब शेतात जिरवा

    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन धाराशिव / प्रतिनिधी चालू वर्षात ‘एल-निनो’ (El-Nino) प्रभावामुळे महाराष्ट्रातील शेतीसमोर गंभीर आव्हाने उभी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचे उशिरा आगमन,पावसातील प्रदीर्घ खंड तसेच एकूण पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण…

  • श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.. मुरुम ( म. नेता ) ​येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा १७ वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. १२) बसव सहकार भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस…

  • छत्रपती संभाजी महाराज जयंती निमीत्त गरजवंत शाळकरी मुलांना 25 सायकलीचे वाटपशिवशाही प्रतिष्ठानचा उपक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी शिवशाही प्रतिष्ठान आयोजित मध्यवर्ती छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती धाराशिव यांच्यावतीने गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप करण्यात आले. व रक्तदान शिबीर ही घेण्यात आले. यावेळी शिवशाही प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष लखन बापू देशमुख , मार्गदर्शक अभिजीत (दादा) देशमुख, आमदार कैलास दादा पाटील , माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर , प्रतिष्ठित समाजसेवक उचे…

  • सात समुद्रापारचा पक्षकार, धाराशिवची लोकअदालत आणि तंत्रज्ञानाची न्यायाला मिळालेली नवी दिशाअमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग ; लोकअदालतीत जुना वाद सामोपचाराने मिटला

    धाराशिव / प्रतिनिधी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाच्या दारात प्रत्यक्ष हजर राहणेच आवश्यक असते,ही पारंपरिक समजूत आता बदलत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण धाराशिवमध्ये पाहायला मिळाले.सात समुद्रापार अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका पक्षकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकअदालतीत सहभाग नोंदवत,अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वाद सामोपचाराने मिटवला.तंत्रज्ञान आणि न्यायव्यवस्थेचा सुंदर संगम घडवणारा हा निर्णय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र…

  • तुळजापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राणी लक्ष्मीबाई उद्यानातील सिंहाच्या जबड्यात हात घालून उभ्या असलेल्या भव्य-दिव्य छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर कडक उन्हातही शंभूप्रेमींची मोठी रांग लागली होती. सकाळी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील…