मान्सून २०२६ पूर्व तयारी आढावा बैठक धाराशिव / प्रतिनिधी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सराव आयोजित करावेत.विशेषतः तहसीलदार व नगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन सराव घेताना संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष वापर करावा.पाळीव जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्यात यावे.तसेच गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अतिवृष्टीऐवजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कोणती पर्यायी पिके…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी बाळासाहेब मारुती कांबळे, रा. मोहा, ता. परळी, जि. बीड हे भाविक श्री तुळजाभवानी मातेचा कुलधर्म-कुळाचार करण्यासाठी तुळजापूर येथे पुजारी सुशांत बाळासाहेब भोसले यांचे घरी आले होते. पूजाविधी व जेवण झाल्यानंतर भाविक पुढील प्रवासासाठी निघून गेले. मात्र त्यांची एक पिशवी चुकून भोसले यांच्या घरी राहिली.…
परंडा / प्रतिनिधी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे यांच्या आदेशानुसार व धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, सुवर्णकार समाजाच्या व्यावसायिक व कायदेशीर प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि समाज बांधवांना संघटित करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.परंडा…
परंडा / प्रतिनिधी मराठा साम्राज्याचे शूर योद्धा , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे परंडा पंचायत समिती कार्यालयात दि. १४ मे गुरुवार रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची पुजा पंचायत समितीचे सभापती यांचे प्रतिनिधी शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव , ॲड रणजित खरसडे ,…
धाराशिव / प्रतिनिधी राम नगर धाराशिव येथे मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३७०व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मागीलवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळून जवळपास 170 रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य योगदान व सहकार्य केले. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (श प) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शाळांच्या वर्गखोल्या, छत, भिंती व…
भूम / प्रतिनिधी प्रत्येक बूथ प्रमुख आणि जबाबदार कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभाग वार्डाच्या मतदारयादीच सूक्ष्म नियोजन करून एस आय आर नुसार शुद्धीकरण करून घेतल्यास भविष्यात निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेची सूत्र भाजपच्याच हाती येतील असा विश्वास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे यांनी भूम येथील कार्यकर्त्या कार्यशाळेत बोलताना विश्वास व्यक्त केला . बुधवार दिनांक 13 मे 2026…
धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या जिल्हा धाराशिव शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांतची नुकतीच महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली . या बैठकीत सन २०२६ – २७ या कालवधीसाठी सर्वानुमते धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी भैरवनाथ कानडे यांची…
कळंब / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रा. प. कळंब आगाराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कर्मचारी पाल्यांसाठी निबंध, प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.निबंध स्पर्धेत आयुष बाबुराव यादव याने प्रथम क्रमांक पटकावला. संभाजी बाबुराव यादव याने द्वितीय तर अपूर्व आबा…