Live News…..Breaking News!

.

  • खरीप २०२५ पीकविमा; ₹३३६ कोटी वितरित करण्याचे आदेशआमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे खरीप २०२५ ची ३३६ कोटींची पीक विमा रक्कम तात्काळ वितरित करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहे.विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगांवर घेतलेले आक्षेप राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (STAC) फेटाळून लावले, त्यानंतर धाराशिवाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे कठोर आदेश दिले आहेत. आमदार राणाजगजितसिंह…

  • शनी अमावस्येनिमीत्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट रोडवर असणाऱ्या  मंगरूळ सरडेवाडी शिवारातील श्री शनी मंदिरात शनी अमावस्या निमित्ताने श्री शनेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी दि १६ दिनी शनी अमावस्या निमित्ताने श्री शनेश्वर मूर्तीस सकाळी  तैल अभिषेक करण्यात आला, त्यानंतर आरती  करण्यात आली शनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर श्री शनिश्वर मंदिर परिसरात आयोजित…

  • मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने कामाला लागा – संपर्कप्रमुख उन्मेष पाटीलउमरगा येथे शिवसेना पक्षांच्या बीएलओंचे प्रशिक्षण व संवाद बैठक संपन्न.

    मुरुम ( म. नेता ) मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियान अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमरगा-लोहारा, तुळजापुर व औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने बुथनिहाय नेमण्यात आलेल्या बीएलओ यांचे प्रशिक्षण व संवाद बैठक शनिवार दि.१६ मे रोजी शांताई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील बीएलओ यांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. उपस्थित…

  • महिलांच्या गळयातील मणिमंगळसुत्र चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

    चार आरोपीसह ८ लाख ३८,५०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात. धाराशिव / प्रतिनिधी तुळजापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. ०१.०५.२०२६ रोजी तुळजाभवानी मंदीरात भाविक महिलेच्या गळयातील गंठण चोरी केल्यावरून पोस्टे तुळजापूर गुरनं २१०/२०२६ क ३०३(२) भान्यांसं अन्वये अनोळखी महिलांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे…

  • दिशा समितीची आढावा बैठक १८ मे रोजी; खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

    धाराशिव / प्रतिनिधींनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ‘जिल्हा विकास समन्वय आणि लक्षवेधी समिती’ (दिशा) ची महत्त्वाची आढावा बैठक सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. बैठकीचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणेदिनांक: १८ मे २०२६ (सोमवार) वेळ: दुपारी ठीक…

  • शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटन प्रमुखपदी जि.प. सदस्या सुवर्णा पाटील यांची नियुक्ती

    लोहारा / प्रतिनिधी शिवसेनेचा धाराशिव जिल्ह्यात विस्तार वाढविण्यासाठी शिवसेना संघटन अधिक बळकट करण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा परिषदेच्या सदस्या सुवर्णा सतीशराव पाटील यांची शिवसेना महिला जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देऊन त्यांचा…

  • मराठा समाज मंदिरासाठी जागा तातडीने निश्चित करा ; विकासकामांना गती देण्याच्या पालकमंत्री सरनाईक यांच्या सूचना

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करण्यात यावी.जागा निश्चित झाल्याबाबतचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करावा तसेच जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकासकामे, समित्यांच्या नियुक्त्या,अतिवृष्टीग्रस्त कामांची प्रगती,विद्यार्थ्यांच्या नासा अभ्यास दौऱ्याची निवड प्रक्रिया तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध विषयांचा…

  • शिवसेनेत सुरज साळुंके यांच्यावर धाराशिव लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाची मोठी जबाबदारी

    नव्या जोमाने पक्ष संघटन आणखी मजबूत करणार – साळुंके धाराशिव / प्रतिनिधी शिवसेनेचे सुरज राजाभाऊ साळुंके यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या धाराशिव लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र शिवसेना नेते तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र श्री. साळुंके यांना दिले आहे.…

  • विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे राष्ट्रीय संयोजक किशनजी प्रजापत यांची रुपामाता-परिवार-कार्यालयास सदिच्छा भेट.

    धाराशिव / प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे राष्ट्रीय संयोजक मा. श्री. किशनजी प्रजापत यांनी तुळजापूर येथील रुपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह व रुपामाता परिवार-फाऊंडेशन कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अ‍ॅड. अजित गुंड पाटील, जिल्हा महामंत्री विजयराव वाघमारे व जिल्हा संयोजक…

  • प्रा कृष्णा लांडगे यांना अर्थशास्त्र विषयात ‘पीएचडी’ प्रदान.

    धाराशिव जिल्ह्यातील खवा उत्पादकांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीवर मांडला महत्त्वपूर्ण शोधनिबंध परंडा / प्रतिनिधी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा कृष्णा लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाने नुकतीच पी एचडी प्रदान केली. दिनांक 22 /04/2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर…