Live News…..Breaking News!

.

  • नोकरीच्या संधींसाठी २२ मे रोजी धाराशिव येथे रोजगार मेळावा

    धाराशिव / प्रतिनिधी शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार/नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने प्लॅसमेंट ड्राईव्हचे/पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, २२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…

  • शिष्यवृत्ती परीक्षेत तुळजापुर नगरपालिका शाळेचे अभूतपूर्व यश

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर खुर्द येथील आएसओ मानांकित नगरपालिका शाळेने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. शाळेतील तब्बल 16 विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातून न.पा. मनपा विभागातून सर्वोत्तम निकाल नोंदवित,भौतिक सुविधांचे सर्व आवश्यक मापदंड दंड पूर्ण करणाऱ्या या शाळेने गुणवत्तेत ही कमी नसल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.16…

  • औषध विक्रेता संपाला अणदूर, नळदुर्ग,जळकोट मध्ये उस्फुर्त प्रतिसाद

    अणदूर / प्रतिनिधी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन च्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या आदेशानुसार नळदुर्ग,अणदूर, जळकोट, इटकळ येथील सर्व औषधी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून, संपाला पाठिंबा दर्शविला, दिवसभर या चारही शहरातील औषधी दुकाने बंद असल्याने रुग्णाचे हाल झाले, या वेळी औषधी दुकानदारांनी ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी सरकारने…

  • श्रीपतराव भोसले हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

    इयत्ता आठवीचे ६२ तर पाचवीचे ५९ असे एकूण १२१ विद्यार्थी शिष्यवर्ती परीक्षेत पात्र धाराशिव / प्रतिनिधी येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत १२१ विद्यार्थी पात्र ठरले असून हे दैदिप्यमान यश प्रशालेने प्राप्त केले आहे . इयत्ता आठवी स्कॉलरशिप मध्ये २०० पेक्षा अधिक गुण घेणारे २९ तर पाचवीत ९ विद्यार्थी आहेत. आठवीतून मयुरेश स्वामी…

  • धाराशिव जिल्ह्यात क्रांती घडवणारा ‘बायोगॅस’ प्रकल्पाची आ. राणादादांकडून पाहणी

    धाराशिव / प्रतिनिधी ​ धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत अभिमानास्पद व आनंदाची बातमी असून, ​शाश्वत ऊर्जा आणि समृद्ध शेतकरी हेच ध्येय बाळगून जिल्ह्यातील आष्टा येथे ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (CBG) प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, या कामाची पाहणी आज मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. येत्या ६ महिन्यांत 6 टीपीडी TPD क्षमतेचा पहिला…

  • जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते आयुर्वेदिक महाविद्यालयात स्मरणिकेचे व हरीत गृह उद्यानाचे उद्घाटन

    धाराशिव / प्रतिनिधी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे “विस्मय २०२५” या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच “संजीवनी हरित गृह उद्यान” यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. ज्ञान, संशोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमात स्मरणिकेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय वाटचालीचा गौरवशाली…

  • दुचाकींसाठी ‘एमएच25बीएल’ (‘MH25BL’ ) मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH25BL’ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार असून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची तसेच लिलाव प्रक्रिया राबविण्याची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. नवीन वाहन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होत असल्याने कार्यालयीन व्यवस्थेवर…

  • अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस

    महिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा ; ४० प्रवाशांचा गट झाल्यास बस उपलब्ध धाराशिव / प्रतिनिधी अधिक मासानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून दि.१७ मे २०२६ ते दि. १५ जून २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.अधिक मास महिलांसाठी खास या उपक्रमांतर्गत महिला,ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक,अंध,दिव्यांग तसेच इतर प्रवाशांसाठी…

  • धाराशिव च्या स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त.

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत येरमाळा परिसरातील वडजी शिवारात 62 लाखाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशाने स्थागुशाचे पथक धाराशिव जिल्हयातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस…

  • समाजातील गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करावे. – हभप धर्मराज दादा महाराज सामनगावकर

    पाचपिंपळ्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा गवंडी काम व बिगारी काम करणाऱ्या मजुराचा मुलगा बनला अधिकारी . परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथील युवक नामदेव श्रीमंत खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय पदी निवड झाली त्याबद्दल त्याचा पाचपिंपळा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे व गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम आई-वडील व सासू-सासरे…