धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील ग्रामजोशी मधुकर व्यंकटेश जोशी यांचे पुणे येथे भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांच्या निधनाने पाडोळी (आ.) तसेच पंचक्रोशीतील सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या दोन्ही कारसेवांमध्ये सक्रिय सहभाग…
मुरूम / प्रतिनिधी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान-मोठे नाले आणि गटारींमधील गाळ त्वरित उपसण्यात यावा, या मागणीसाठी मुरूम शहर कृती समितीने नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक श्रीराम नाडे यांना शुक्रवारी (ता. २२) रोजी सिद्धलिंग हिरेमठ यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले आहे. वेळेत सफाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. समितीने निवेदनात नमूद केले…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय किसान संघ धाराशिव च्यावतीने शेतकऱ्यांना त्यांच्या घरी, बांधावर,ना नफा ना तोटा तत्वावर होलसेल दराने सोयाबीन बियाणे वाटप. करण्यात आले. सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपनीने पण आपले दर वाढवलेले आहेत. खरीप हंगामाकरिता सध्या शेतकरी खते बियाणे जुळवाजुळव करीत आहे. सोयाबीन बियाणे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय…
दहिवडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील रहिवासी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील प्रसिद्ध वकील ॲड. गणेश विलास पाटील (वय ४०) यांचे गुरुवार, २१ मे रोजी रात्री पुण्यात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२:०५ वाजता दहिवडी येथील त्यांंच्या शेतामध्ये नातेवाईक ,मित्र परिवार,विधीज्ञ,ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल…
धाराशिव / प्रतिनिधी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल खून अथवा अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद शासनाने केली आहे.त्यानुसार संबंधित पात्र वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार…
काँग्रेसकडून धीरज देशमुख, अशोक जगदाळे यांची नावे चर्चेत! नळदुर्ग / प्रतिनिधी राज्यातील गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिककाळ रखडलेल्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्याने १८ जूनला मतदान होणार आहे. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक होत असल्याने महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. महायुतीमध्ये…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील दर्गा रोड परिसरात आज दि. 21 मे 2026 रोजी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाखा बनकवडे तसेच शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुरज साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुरवठा अधिकारी विशाखा बनकवडे यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय…
धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे जिल्हाभरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कार्यरत असलेल्या उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास व्यक्त केला आहे. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ग्रामीण भागातील प्रश्न असोत किंवा सर्वसामान्यांच्या हक्कासाठीचे…
आंदोलनाचा इशारा! धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील विजय चौक दर्गा रोड परिसरातील नागरिकांना गेल्या तब्बल ११ दिवसांपासून पाण्याच्या थेंबासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचे अक्षरशः हाल होत असताना नगरपालिका प्रशासन मात्र बेजबाबदारपणे झोपेचे सोंग घेत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या संतापजनक प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना लोकसभा…
धाराशिव / प्रतिनिधी विमा कंपनीने सादर केलेले तांत्रिक उत्पादन आकडेवारी वस्तुनिष्ठ नाही.शेतकऱ्यांना मिळणारी विमा भरपाई ही कापणी प्रयोगाच्या उत्पादनाच्या आधारावर देण्यात यावी अशी मागणी या अगोदर केली होती. पिक कापणी प्रयोगाच्या आधारावर हेक्टरी ३० ते ३५ हजार म्हणजे एकूण ९७८ कोटी रुपये जिल्ह्यास मिळणे अपेक्षित आहे. परंतु तांत्रिक उत्पादनाच्या निकषामुळे ३३६ कोटी रुपये मिळत आहेत.…