धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.यामध्ये पांडुरंग ज्ञानदेव घुले वाशी शहराध्यक्ष, औदुंबर ठोंगे परंडा तालुका उपाध्यक्ष, तानाजी सांगळे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील वीरशैव जंगम मठ यांच्या वतीने 15 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 10 दिवसांचा मोफत चित्रकला प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गास 8 जून 2026 पासून सुरुवात होणार असून प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 30 मे 2026 आहे. धाराशिव सांजावेस गल्ली,येथील वीरशैव जंगम मठात या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध कला प्रकार शिकवले…
तुळजापूर / तुळजापूर शहरातील बोंबले चौक परिसरात किरकोळ वादातून एका कापड व्यावसायिकावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मयुर बाळासाहेब पेंदे (वय 35, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हल्ला करणाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात…
येरमाळा / प्रतिनिधी मलकापूर (ता.कळंब) येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव भीमराव लोमटे (वय.८५) यांचे रविवारी सकाळी ८.३० वा अल्पशा आजाराने निधन झाले. येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष, पत्रकार सुधीर लोमटे यांचे ते वडील होतं.त्यांच्या पाश्चात दोन मुलं, सुना , नातवंडे, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी दुपारी १.०० वाजता मलकापूर येथील स्मशानभूमीत…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथील सेवानिवृत्त वन अधिकारी विनय परळकर व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी सुप्रिया परळकर यांनी आपल्या निवासस्थानी सोमवार ता.२५ ते ३१ मे दरम्यान अधिक मास निमित्त भागवत सप्ताहचे आयोजन केले आहे. यावेळी वेदशास्त्र संपन्न वेणुगोपाळाचार्य काशीकर यांच्या वाणीने भागवत कथा सांगितली जाणार आहे. दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत संस्कृतमधून…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिवच्या वतीने येथील सुप्रसिद्ध कवी व सहशिक्षक श्याम नवले यांच्या आवर्तनाच्या आतबाहेर या काव्यसंग्रहाचा आज सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता धाराशिव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सभागृह,डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ भोगावती नदी पुलाच्या बाजूला प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध…
अणदूर ( म. नेता ) सध्याच्या या कलियुगात प्रगतीला चालना व गती देण्यासाठी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचाराची गरज असून कोणत्याही क्षेत्रात मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती अशक्य असल्याचे स्पष्ट मत जेवळी वीरक्त मठाचे मठाधिपती श्री गंगाधर महास्वामीजी यांनी व्यक्त केले. अणदूर ग्रामस्थांच्या वतीने जय मल्हार पत्रकार संघाने जेवळी येथे जाऊन मठाधिपती गंगाधर महास्वामीजी यांचा सत्कार करण्यात आला.…
क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेजचा पुढाकार; बीएसडब्ल्यूसाठी शिक्षण व साहित्य विनामूल्य धाराशिव / प्रतिनिधी एसटी महामंडळ धाराशिव विभाग, आत्महत्याग्रस्त शेतकरी व खेळाडूं या कुटुंबातील मुला-मुलींचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे खंडित होऊ नये आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून भविष्यात कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलावी, या उद्देशाने धाराशिव येथील क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेजतर्फे मोफत शिक्षण उपक्रम राबविण्यात येत…
परंडा / प्रतिनिधी परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने संबंधितांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतीही तोडकाम कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.सदर प्रकरणात बाजार समितीने वृत्तपत्रामधून नोटीस प्रसिद्ध करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई जाहीर केली होती. याविरोधात संबंधित दुकानदारांनी अँडवोकेट…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील सिलींग जमीन धारकांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून,सिलींग जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-२ मधून थेट भोगवटादार वर्ग-१ अर्थात पूर्ण मालकी हक्कामध्ये रुपांतरित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.या संदर्भातील “महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग-२ चे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे) नियम २०२६” हे नियम राज्य शासनाच्या…