Live News…..Breaking News!

.

  • बावची येथील जलतारा प्रकल्पाची परंडा गटविकास अधिका-यांनी केली पाहणी.

    परंडा / प्रतिनिधी मौजे बावची तालुका परंडा येथे जलतारा प्रकल्पाचे परंडा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री गायकवाड यांनी आपल्या पथकातील विस्तार अधिकारी श्री शिंदे, विस्तार अधिकारी श्री कुठे , इंजिनिअर श्री पाटील, ग्रामसेवक शितल गिरी मॅडम यांच्यासह बावची येथील गट नंबर 23 मधील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन…

  • उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी ३३ नामनिर्देशन अर्जाची उचल तर १ अर्ज दाखल

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक सूचना दिनांक २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २५ मे २०२६ रोजी १० व्यक्तींनी १७ नामनिर्देशन अर्ज ,दिनांक २६ मे २०२६ रोजी ०८ व्यक्तींनी १६ असे एकूण ३३ नामनिर्देशन अर्जाची…

  • उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचे निधन

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक ,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत किसनराव कुलकर्णी यांचं वयाच्या 68 व्या वर्षी राहत्या घरी मेंदूच्या धक्यानं निधन झालं. ते उमरगा नगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक तर उमरगा नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे पहिले उपनगराध्यक्ष राहिले आहेत.याशिवाय उमरगा येथील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम केलेले…

  • तुळजापूरच्या आरोग्य कृती दलात पत्रकार श्रीकांत कदम यांची निवड; लोकमंगल समूहाकडून सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी नागरीकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी जनजागृती आणि तालुकास्तरावर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या “तालुका आरोग्य संपन्न कृतीदल” समितीत तुळजापूर तालुक्यासाठी पत्रकार श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल समूहाच्यावतीने पत्रकार श्रीकांत कदम…

  • धाराशिव येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयात लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांना अभिवादन

    धाराशिव / प्रतिनिधी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंती निमित्त मंगळवारी (दि.26) अभिवादन करण्यात आले. धाराशिव शहरातील काँग्रेस भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व.विलासराव देशमुख…

  • उस्मानाबाद -लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी संजय मुंदडा यांची उमेदवारी दाखल

    कळंब / प्रतिनिधी उस्मानाबाद – लातूर -बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी कळंब नगरपालिकेतील शिवसेना (उबाठा )पक्षाचे गटनेते नगरसेवक संजय पांडुरंग मुंदडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळंब नगर परिषदेतील दहा नगरसेवकांच्या स्वाक्षरीने सुचवलेली सदर उमेदवारी लढविण्यावर संजय मुंदडा ठाम आहेत. महाविकास आघाडीचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडे उमेदवारीची…

  • पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या  कृषी विद्यापीठाच्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे आग्रही शिफारस

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश धाराशिव / प्रतिनिधी ‘तांत्रिक उत्पादन’ (Technical Yield) प्रणाली प्रत्यक्ष परिस्थितीच्या विसंगत परिणाम देत असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर प्रणाली नवीन असल्याने त्यातील काही त्रुटी आणि मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत. या गंभीर विसंगतीबाबत आग्रही पाठपुरावा करून आपण जिल्हा प्रशासनाला कृषी विद्यापीठाकडून वैज्ञानिक अहवाल मागविण्यास भाग पाडले. परभणी येथील वसंतराव नाईक…

  • धाराशिव येथील ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

    उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संमेलनाचे निमंत्रक डॉ.शरद गोरे यांनी दिली,२९,३० मे २०२६ रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये हे संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.नंदकुमार राऊत…

  • मांजरा शुगर मंगरुळ कारखान्याकडुन ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मे.टन रु.१००/- प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा.

    धाराशिव   /  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा मांजरा शुगर इंडस्ट्रीजचे मार्गदर्शक मा.दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. गाळप हंगाम सन २०२५-२६ मध्ये कारखान्याने १२२ दिवसात एकुण ६,२९,३२७ मे.टन ऊसाचे गाळप करुन ६,३५,४०० क्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.२९…

  • नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांचा सत्कार

    धाराशिव  /  प्रतिनिधी धाराशिव जिल्हयाचे नवनियुक्त कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांचा सत्कार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. धीरज पाटील यांच्या हस्ते कॉंग्रेस भवन धाराशिव येथे करण्यात आला.  यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, राजाभाऊ शेरखाने, तुळजापुर नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते  नगरसेवक अमोल कुतवळ , खलील शेख सर, प्रशांत पाटील, धनंजय राऊत आदिसह कॉंग्रेसचे…