Live News…..Breaking News!

.

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘दांडिया महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथे जनरल ॲक्टिव्हिटी अँड स्टुडंट्स असोसिएशन (GASA) यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ‘दांडिया महोत्सव २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवात महाविद्यालयातील महिला प्राध्यापक, महिला शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत…

  • बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण खैरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

    परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य नारायण मारुती खैरे सर यांना महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी, पुणे यांच्या वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार – २०२६ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…

  • तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर व शिव मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विकासकामांबाबत पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंदिर परिसरातील विकासकामांचा मंजूर आराखडा, अंदाजपत्रक, इस्टिमेट, कामांवरील खर्च, पूर्ण झालेली कामे आणि सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती भाविकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महादेव भागवत खटावकर व…

  • येडेश्वरी दर्शनासाठी येरमाळ्यात भाविकांची मोठी गर्दी, देवीच्या डोंगराला खेटे मारण्याची परंपरा भाविकांनी केली पूर्ण

    येरमाळा / प्रतिनिधी येथील श्री.येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव उत्साहात सुरु असुन देवीच्या घटस्थापनेच्या दुसऱ्या माळेपासून देवीच्या डोंगराला पाच दिवस खेटा (फेरी) घालण्याची परंपरा असुन स्थानिक भविकांसह पंचक्रोशीतील भाविकांचे आज पाच खेटे पुर्ण झाले. गुरुवारी (ता. १५) नवरात्रीची ललित पंचमी व नवरात्रीची उपासना करणाऱ्या महिला भाविकांची गर्दी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या…

  • एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा!

    पंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम;प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण धाराशिव / प्रतिनिधी एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मधील दुसऱ्या पंधरवाड्याचे ४ कोटी ६० लाख रुपयांचे ऊस बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग केले आहे. कारखान्याकडे १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत गाळपासाठी आलेल्या १५ हजार मेट्रिक…

  • नवरात्रौउत्सवात श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज, शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सहाव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात येते. धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुराशी युद्ध करताना देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडते. मुरलीधर रूपातील देवीने…

  • चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार नवे स्पंदन ; धाराशिवची नऊ बालके हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना

    धाराशिव / प्रतिनिधी लहानग्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आस प्रत्येक आई-वडिलांच्या मनात असते.मात्र,आपल्या चिमुकल्याच्या हृदयात जन्मतः किंवा बालवयात निर्माण झालेला विकार समजताच पालकांच्या मनात चिंतेचे ढग दाटून येतात. अशा परिस्थितीत योग्य वेळी उपचाराची संधी मिळणे म्हणजे त्या कुटुंबासाठी आशेचा नवा किरणच असतो.जिल्ह्यातील हृदयविकाराने ग्रस्त नऊ बालकांच्या आयुष्यात असाच आशेचा…

  • तुळजापूर पालिकेत डॉ एपेजी अब्दुल कलाम यांना अभिवादन

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील नगरपरिषद कार्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन ए.पी जे .अब्दुल कलाम यांची जयंती नगराध्यक्ष विनोद पिटू भैय्या यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी जयंती निमित्ताने गटनेते अमोल कुतवळ यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना गटनेते अमोल कुतवळ म्हणाले की, डॉ कलाम हे 11 वे भारताचे राष्ट्रपती…

  • माझ्यावर किंवा पीएवर आरोप करण्याआधी वास्तव तपासून पहावे

    सध्या दुष्काळ आणि पिण्याचे पाणी याला आपले सर्वाधिक प्राधान्य” – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी “माझ्याबद्दल किंवा माझ्या पीएच्या (PA) नावाने काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. अशा विषयांमध्ये माझे नाव थेट हायलाइट करण्याआधी माझ्याशी संपर्क साधून किमान विचारणा करून वस्तुस्थिती जाणून घेणं अत्यावश्यक होतं,” अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी…

  • देहदान आणि अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती व्हावी -अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान

    जागतिक शरीर रचनाशास्त्र दिन साजरा, ११ देहदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान धाराशिव / प्रतिनिधी माणसाचा मृत्यू झाला तरी त्याचे विचार, संस्कार आणि समाजासाठी केलेले कार्य कायम जिवंत राहते.मृत्यूनंतरही आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडावा,भावी डॉक्टरांना मानवी शरीराचा सखोल अभ्यास करता यावा आणि त्या माध्यमातून असंख्य रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण व्हावा,या उदात्त भावनेतून देहदान करणाऱ्या व्यक्ती आणि…