Live News…..Breaking News!

.

  • निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असून,विविध कामांसाठी नोडल अधिकारी तसेच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व पथकांवर निवडणूकविषयक…

  • पाच हजारांत दिवाळी कशी करायची?

    शेतकऱ्यांची चेष्टा करू नका; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! आ. कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल धाराशिव / प्रतिनिधी “पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची, हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी सांगावे. एक एकर सोयाबीन काढण्यासाठी पाच हजार रुपये मजुरी लागते. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत…

  • दुष्काळाचे संकट गंभीर; प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त!

    पाणीटंचाई, जनावरांचा चारा-पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर लक्ष; नागरिकांनी गावातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. वाढते तापमान, घटता जलसाठा आणि खालावणारी भूजल पातळी यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे आव्हान गंभीर होऊ शकते. ही दाहक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील संभाव्य संकटाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले…

  • आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या आई भिवराबाई सावंत यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन

    परंडा / प्रतिनिधी परंडा-वाशी-भूम मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मातोश्री भिवराबाई जयवंत सावंत यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. त्यांनी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भिवराबाई सावंत या आमदार डॉ. तानाजी सावंत तसेच शिवसेनेचे…

  • खरीप २०२० पीक विमा प्रकरण अंतिम सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी,

    २२७ कोटींच्या पीकविम्यासाठी बळीराजाच्या हक्काची लढाई सुरूच – मा. आ. चौगुले मुरूम / प्रतिनिधी आज दि.१४ ऑक्टोबर २०२६ रोजी खरीप २०२० पीकविमा प्रकरणाच्या सुनावणीसाठी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उपनेते तथा माजी आमदार मा.ज्ञानराज चौगुले व त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप हे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्काचे उर्वरित २२७ कोटी रुपयांच्या पीकविमा प्रकरणाची सुनावणी…

  • विद्यार्थी संवाद कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे बळ

    संशोधनाला दिशा; तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्ही व इंबेडेड सिस्टिम लॅबचे उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संशोधनाची जोड, संशोधनाला उद्योजकतेची दिशा आणि नवकल्पनांना समाजोपयोगी स्वरूप देण्याच्या उद्देशाने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात १० ऑक्टोबर रोजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC), इंटरनल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स सेल (IQAC) आणि सेवा संकल्प अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने…

  • नवरात्रौउत्सवाच्या चौथ्या माळेस बुधवारी श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार

    भाविकांची अलोट गर्दी तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू असून, आज बुधवार (१४ ऑक्टोबर) रोजी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली. शारदीय नवरात्रीतील आजची चौथी माळ आहे. काल मंगळवार (१३ ऑक्टोबर) रोजी देवींची वाघ या वाहनातून छबिना मिरवणूक काढण्यात आली. या छबिना मिरवणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे…

  • श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी बसवराज पुजारी यांची ५० हजार रुपयांची देणगी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगीदाराचा सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण केली. बसवराज पुजारी हे आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा…

  • नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापुरात ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ

    उमेदच्या विशेष विक्री व प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या हस्ते उद्घाटन दुष्काळाच्या संकटात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील महिलांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा,त्यांच्या हातांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने त्यांची वाटचाल अधिक सक्षम व्हावी,या उद्देशाने तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त ‘उमेद’ अभियानांतर्गत ग्रामीण…

  • आ.सतीश चव्हाण हे पदवीधरांच्या सातत्याने संपर्कात असतात — बालाजी तांबे

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे सातत्याने पदवीधरांच्या संपर्कात असतात. त्यांनी आजपर्यंत पदवीधरांच्या समस्या जाणून घेऊन तळमळीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. विधान परिषदेत आवाज उठून पदवीधरांना शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात अनेक योजना राबवल्या आहेत. विश्वास, अपेक्षा व जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी आजपर्यंत अनेक कामे केलेली…