Live News…..Breaking News!

.

  • तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या सीईओ पदाचा उपेंद्र गोविंद तामोरे यांनी स्विकारला पदभार

    तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे श्री. उपेंद्र गोविंद तामोरे (अपर जिल्हाधिकारी) यांनी दिनांक 02 जून 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.श्री. तामोरे हे सन 2002 बॅचचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) असून त्यांना महसूल, नियोजन व प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. संस्थानमध्ये नियुक्तीपूर्वी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), अंधेरी,…

  • समर्थ पतसंस्थेच्या चेअरमनपदी नारायण नन्नवरे , व्हा. चेअरमनपदी संजय व्हटकर यांची बिनविरोध निवड

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील पतसंस्था क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री नारायण नन्नवरे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री संजय व्हटकर यांची संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक प्रकिया पार पडली असून यात संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच ११ जागा या बिनविरोध निवडून आल्या…

  • उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मिलिंद बोरकर निवडणूक निरीक्षक

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक -२०२६ अंतर्गत उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.मिलिंद बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भारत निवडणूक आयोगाच्या १ जून २०२६ पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या दि.१८ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम…

  • राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार

    उमरगा / प्रतिनिधी उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे दिनांक ०६ ते १० जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील अनेक खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या…

  • शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल अखिल म. प्रा.शिक्षक संघाकडून सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हापरिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून पी. एच डी. मिळाल्याबद्दल अखिल म. प्रा. शिक्षक संघातर्फे अल्पसंख्यांक शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात लालासाहेब मगर, बशीर तांबोळी, बाळासाहेब वाघमारे, यांच्या हस्ते सहृदय सत्कार करण्यात आला. व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच नूतन गटशिक्षणाधिकारी प्रकाश पारवे यांचाही अखिल…

  • समकालीन प्रकाशन संस्था पुणे व जागर वाचनाचा यांच्यावतीने पुस्तके मोफत वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी समकालीन प्रकाशन संस्था व जागर वाचनाचा यांच्या माध्यमातून व देणगीदार यांच्या सहकार्याने रुईभर तालुका धाराशिव या केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना विद्यार्थी वाचनालयासाठी प्रत्येकी 6000 रुपये किमतीची पुस्तके आज अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मा. शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे व गटशिक्षणाधिकारी प्रकाश पारवे तसेच लालासाहेब मगर व जिल्हा समन्वयक बशीर…

  • ” सब का साथ , सब का विकास आणि सब का प्रयास त्रिसूत्रीसाठी निवडणूकीच्या रिंगणात – बसवराज पाटील

    महायुतीचा विजयाचा ठाम निर्धार धाराशिव / प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याच्या पाणी रस्ते यासह संपूर्ण विकासासाठी आपण आमदार झाल्यास काम करणार असून विकसित महाराष्ट्रासाठी “सब का साथ , सब का विकास , सब का प्रयास ” या विकासाच्या त्रिसूत्रीच्या अमंलबजावणी साठी…

  • महेश देशमुख रिंगणात; महाविकास आघाडीचा शेतकरी-तरुणांच्या प्रश्नांवर भर

    उमेदवारी अर्ज दाखल; विजयाचा व्यक्त केला विश्वास धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही देत ही निवडणूक जनतेच्या हक्कांसाठीची लढाई असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या…

  • भाजपा – महायुतीकडून बसवराज पाटील यांची उमेदवारी दाखल

    धाराशिव – लातूर – बीड जिल्हयातील महायुतीच्या नेत्यांची मोठी उपस्थिती धाराशिव / प्रतिनिधी विधान परिषदेच्या धाराशिव – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांनी आज सोमवारी धाराशिव जिल्हयाचे जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे आपला उमेदवारी…

  • महायुती-मविआसमोर सचिन उर्फ राजाभाऊ पवारांचे अपक्ष आव्हान

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आणखी एक उमेदवार मैदानात उतरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे धाराशिव नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सचिन उर्फ राजाभाऊ पवार यांनी सोमवारी (दि. १ जून) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून महेश देशमुख तर महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उमेदवारी…