Live News…..Breaking News!

.

  • अधिक मासानिमित्त तेर येथील विष्णू मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    तेर ( प्रतिनिधी ) अधिक जेष्ठ मासनिमीत्ताने धाराशिव तालुक्यातील तेर येथे पुरातन विष्णू मंदीरातील मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे पानभरवेस येथे श्री लक्ष्मी मंदिर असून या मंदिरात कलाकुसर केलेली सुंदर अशी भगवान श्री विष्णूची मुर्ती आहे . ही विष्णू मुर्ती चतुर्भुज असून चार हातांमध्ये शंख, चक्र,गदा,पद्म आहेत. अधिक जेष्ठ…

  • शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज ; ५ व ६ जून रोजी ऐतिहासिक कार्यक्रमांची रेलचेल

    तुळजापूर / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर ५ आणि ६ जून रोजी भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे  तरी या सोहळ्यात जिल्ह्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महेश गवळी, जीवन राजे इंगळे, प्राध्यापक सतीश खोपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. या यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे…

  • घरफोडया करणा-या अट्टल आरोपीस धाराशिव च्या गुन्हे शाखेने केले जेरबंद

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत जिल्ह्यातील अनेक घरफोडी प्रकरणांमध्ये फरार असलेल्या अट्टल आरोपीस अटक करून त्याच्याकडून तब्बल 45 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील 32 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. 30 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे…

  • अहिल्याच्या लेकींनी उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

    धाराशिव / प्रतिनिधी   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती ‘अहिल्या सखी मंच’च्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींचे आजोळ असलेल्या चोराखळी येथील पापनाश मंदिरात अभिषेक, पूजन व आरती करून जयंती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. जयंतीनिमित्त नवजात कन्यांचे स्वागत करून मातांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मातांना वस्त्र व भेटवस्तू…

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डॉ. सोनाली जाधव यांना ‘भौतिकशास्त्र’ विषयातील पीएच.डी. प्रदान

    अणदूर / प्रतिनिधी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून डॉ. सोनाली जाधव यांना भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी ” रेअर अर्थ आयन सबस्टिट्यूशन इफेक्ट ऑन द प्रॉपर्टीज ऑफ गॅडोलिनियम आयर्न गारनेट नॅनो पार्टिकल्स”या विषयावर संशोधन पर ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन…

  • अहिल्यादेवी होळकर यांच्या कामातून प्रेरणा मिळते – आमदार राणाजगजीतसिंह पाटील.

    धाराशिव / प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देश , धर्म, आणि समाज व माता-भगिनींच्या विकासासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते असे प्रतिपादन मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पाटील यांनी अहिल्यादेवी…

  • आवार पिंपरी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथे रविवार दि 31 मे रोजी सकाळी 8 वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त गावातील अहिल्यादेवी होळकर चौकात आवार पिंपरीचे माजी सरपंच सुरेश डाकवाले यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी महिला, गरीब,पिडीत लोकांसाठी तसेच गावोगावी माणसांना व जनावरांना…

  • परंडा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .

    परंडा / प्रतिनिधी कुशल प्रशासक, पराक्रमी वीरांगणा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती परंडा येथे सकल धनगर समाज बांधवांच्यावतीने रविवार दिनांक 31 मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,परंडा तालुका यांच्यावतीने भव्य अशा मंचकावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य प्रतिमेची पूजा, दीप…

  • येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव निलंबित

    धाराशिव / प्रतिनिधी कर्तव्यात निष्काळजीपणा व गंभीर दुर्लक्ष या कारणामुळे येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव यांना जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिलेल्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस विभागाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव यांनी दिलेले आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर. भालेराव नेमणूक…

  • डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!

    धाराशिव जिल्हा आज शाश्वत विकासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपला आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम धडाक्यात सुरू आहे. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम त्याच्या दुरुस्तीसाठी मिळाली आहे. कृष्णा खोऱ्याचे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी साठवण्यासाठी तुळजापूरचा रामदरा तलाव सज्ज झाला आहे.  काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. यंदाच्या हंगामात…