Live News…..Breaking News!

.

  • जागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्यावतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

  • तेर येथे अधिक मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री कालेश्वर मंदिरात प्रति अधिकमास प्रमाणे अधिक ज्येष्ठ कृ.६ शनिवार दि.६-६-२०२६ ते अधिक ज्येष्ठ कृ.१३ शनिवार दि.१३-६-२०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित केला आहे. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण ११ ते १२ गाथा…

  • भैरवनाथ शुगर वर्क्स तेरणा नगरचा स्तुत्य उपक्रम: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तीन हजार वृक्षांचे भव्य वृक्षारोपण

    ढोकी ( म. नेता ) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘भैरवनाथ उद्योग समूहा’च्या वतीने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. भैरवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मा. तानाजी सावंत आणि व्हाईस चेअरमन. विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट नं. ०६, तेरणा नगर ढोकी , ता. जि.…

  • तुळजापूरच्या वासंती गायकवाड यांना उत्कृष्ट साने गुरुजी बालभवन सन्मान

    तुळजापुर / प्रतिनिधी ग्रामीण शिक्षणाला नवसंजीवनी देत साने गुरुजींच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा कृतीतून जपणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मैलारपूर मुर्टा येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. वासंती उमाजी गायकवाड यांच्या कार्याला राज्यस्तरावर मानाची दाद मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, सर्जनशील आणि विद्यार्थीकेंद्री कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा…

  • मुरुम शहरातील आरोग्य सुविधेबाबत माजी नगराध्यक्ष अँड. जयश्री भोसगे यांचे निवेदन

    मुरूम (म नेता ) मुरुम शहरातील नागरिकांच्या मूलभूत आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून शहरात 24तास वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी आणि खाजगी डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार द्यावेत या मागणीसाठी मुरूम नगरपरिषद प्रशासनाकडे नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष ऍड. जयश्री भोसगे यांनी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शहरातील काही डॉक्टरांकडून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत…

  • आचारसंहितेत उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई ; 18 दिवसांत 146 गुन्हे उघड, 126 आरोपींना अटक,27 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

    धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून,आदर्श आचारसंहिता दिनांक 18/05/2026 पासून लागू करण्यात आलेली आहे.या आचारसंहिता कालावधीत अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांद्वारे अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री यावर पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने राजेश…

  • संस्कार भारतीच्या वतीने गायिका सुमन कल्याणपुर यांना श्रद्धांजली

    धाराशिव / प्रतिनिधी शहरातील शिवशंभुपंढरी वसाहतीत धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्यावतीने सुप्रसिद्ध गायिका स्व. सुमन कल्याणपुर व प्रख्यात गायक व अभिनेते पंडित स्व.चंद्रकांत लिमये यांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी देवगिरी प्रांत दृश्यकला संयोजक शेषनाथ वाघ ,जिल्हा संरक्षक अनिल ढगे , प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाध्यक्ष श्याम सुंदर भन्साळी, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे सुंभेकर उपस्थित होते. दोन्ही दिग्गज…

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोपगेट, इनोव्हेशन, इंटर्नशिप मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला.  या कार्यक्रमाची सुरुवात अंतिम वर्षाचा विद्यार्थी जगदीश सुतार याने केलेल्या सुमधुर बासरी वादनाने झाली. त्यानंतर शेख नयूम, अल्सफा अरब, जगदीश सुतार व माने अभिजित यांनी महाविद्यालयातील चार वर्षांतील विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर आठवणी उजागर करत…

  • नायब तहसिलदार विशाखा बलकवडे यांचा नेतृत्वाखाली अवैध गौण खनिज विरोधी कारवाई

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली आज धाराशिव तालुका गौण खनिज भरारी पथकाने खानापूर तालुका धाराशिव हद्दीमध्ये एक अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे दहा टायर हायवा पकडून कारवाई केली आहे. सदर पथकामध्ये मंडळाधिकारी श्री गुळमिरे , सय्यद सरवर ,ग्राम महसूल अधिकारी राजेश पडवळ, सतीश निंबाळकर ,राम गुट्टे ,विशाल फासे, महसूल…

  • ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांची मागणी.

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा, अशी मागणी रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण,विभागीय कार्यालय  धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ढोकी…