Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव येथील एनसीएमसी केंद्रांची व्यवस्था सुरळीत ; अँड अजीत गुंड – पाटील यांच्या पाठपुराव्यास यश

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या गैरसोयीबाबत रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अ‍ॅड. अजित गुंड पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील नोंदणी केंद्रांवरील व्यवस्था आता सुरळीत करण्यात आली आहे.एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी…

  • उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक प्राधिकारी संस्था निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी दि.२२ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.ही मतमोजणी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), तुळजापूर रोड, धाराशिव येथे होणार असून प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या मतदारसंघासाठी…

  • वैद्यकीय प्रवेश परीक्षा शांततेत ; धाराशिव येथे RE-NEET ला ९१.५५ टक्के उपस्थिती

    २०७२ पैकी १८९७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; १७५ परीक्षार्थी गैरहजर धाराशिव / प्रतिनिधी देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी RE-NEET (UG) २०२६ परीक्षा रविवारी धाराशिव शहरातील पाच केंद्रांवर शांततेत,शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न बाळगलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निर्णायक असल्याने सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी…

  • निरोगी जीवनाचा मंत्र देणारा योग दिन उत्साहात साजरा ७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

    धाराशिव / प्रतिनिधी बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी आज जगभर स्वीकारली जात असून,निरोगी आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज २१ जून रोजी रविवारी धाराशिवमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे,विद्यार्थी,खेळाडू,युवक- युवती,नागरिक आणि योग साधक-…

  • जागतिक योग दिनानिमित्त भाजपा कार्यालयात भव्य योगशिबीर संपन्न;

    जिल्ह्यातील सर्व १९ मंडलांत कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती धाराशिव / प्रतिनिधी जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण धाराशीव जिल्ह्यातील सर्व १९ मंडलांमध्ये विविध ठिकाणी भव्य योगशिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम धाराशीव येथील भाजपा जिल्हा कार्यालय, ‘प्रतिष्ठान भवन’ येथे सकाळी ठीक ६:०० वाजता पार पडला. या उपक्रमात जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि…

  • परंडा येथे शाखा अधिकारी बिराजदार यांचा सत्कार

    परंडा / प्रतिनिधी धाराशिव जनता सहकारी बँकेचे परंडा शाखा अधिकारी म्हणून श्री बिराजदार यांनी नुकताच पदभार स्विकारला त्यानिमीत्त रामेश्वर सद्गुरू सहकारी संस्थेच्यावतीने समाजगौरव पुरस्कर्ते व सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ पवार भोत्रेकर यांनी श्री बिराजदार यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे कर्मचारी श्री मोरे, श्री बाबर, श्री देशमाने , श्री गरड , श्री मोताळे आदि…

  • तुळजापुरात शिवसेना उबाठाच्या वतीने वर्धापन दिन साजरा

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचा ६० वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस ज्येष्ठ नेते माधवअण्णा कुतवळ , ऋषिकेश मगर , रामचंद्र ढवळे वकील , राहुल खपले, सुधीर कदम, श्याम पवार, बापूसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे , संजय राऊत , दिनेश रसाळ, विकी वाघमारे, भरतआप्पा जाधव , सुनील…

  • विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.19)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा धाराशिव यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून…

  • जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांंच्याकडून आष्टा कासार ग्रामस्थांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष पाहणी व आढावा

    लोहारा / प्रतिनिधी आष्टा कासार (ता. लोहारा) येथील ग्रामस्थांनी जलजीवन मिशन अंतर्गत MGP मार्फत झालेल्या कामांबाबत तक्रारी मांडल्या होत्या. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व जि.प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांनी गावास भेट देऊन पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी नागरिकांनी पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची गंभीर बाब…

  • विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

    दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार शुभारंभ; उल्हास पवार अध्यक्षस्थानी धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील विधायक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विलासराव देशमुख सेंटरच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे…