Live News…..Breaking News!

.

  • Test

    This is test post

  • युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – सीईओ प्रियंवदा म्हाडदळकर

    धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन,समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव,यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग,धाराशिव यांच्या सहकार्याने आयोजित नशामुक्त भारत अभियानाचा उद्घाटन सोहळा आज बुधवारी (दि.१७ जून) उत्साहपूर्ण वातावरणात के.टी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ.गजानंद वाले…

  • सत्ता विरुद्ध जनतेची लढाई; विधान परिषदेत महाविकास आघाडीचा विजय निश्चित – महेश देशमुख

    धाराशिव / प्रतिनिधी विधान परिषद निवडणूक 2026 ही केवळ उमेदवारांमधील निवडणूक नसून सत्ताधारी व्यवस्थेविरोधात जनतेच्या भावना व्यक्त करणारी लढाई आहे. मजूर, शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीला 600 हून अधिक मते मिळतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी व्यक्त केला.…

  • जनहिताच्या प्रमुख प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्याची चव्हाण फाउंडेशनची आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे मागणी

    उमरगा / प्रतिनिधी येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमरगा-लोहारा मतदारसंघातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे चर्चा घडवून आणावी तसेच संबंधित मंत्री, विभागीय अधिकारी आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्यावतीने आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज…

  • श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत महत्वपूर्ण बदल;

    १८ जूनपासून देणगी दर्शन रांगेतील व सामान्य रांगेतील भाविकांचे दर्शन एकाच ठिकाणाहून तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या व दर्शन व्यवस्थेतील सुसूत्रता लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दर्शन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नवीन दर्शन व्यवस्था गुरुवार, दि. १८ जूनपासून अंमलात येणार आहे.नवीन दर्शन व्यवस्थेनुसार ५०० रुपये…

  • दिव्यांग प्रमाणपत्राआधारे बदली ; २१शिक्षकांची विभागीय चौकशी प्रस्तावित

    कळंब / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग इतर प्रकारचे आजार असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून जिल्हा अंतर्गत बदली करून घेतली होती. बदली करून घेतलेल्या शिक्षकांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी तक्रार कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी केली होती. तक्रारीवरून जिल्हा शल्यचिकित्सक धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती…

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांचा गौरव सोहळा

    धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विविध गुणदर्शनाचा आढावा घेऊन, विशेष गुणवंतांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बीआयआर फिल्मस चे मालक धीरज देवन व क्रेडिट कंट्रोल…

  • पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी; १२ संशयित ताब्यात, ९.४ लाखांचा मुद्देमाल जप्त.”

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोहारा परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना प्राप्त झालेल्या…

  • जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद,जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर,कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व…

  • आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ लोणीच्या वतीने बिभिषण रोडगे सरांचा सत्कार

    परंडा / प्रतिनिधी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, लोणी यांच्या वतीने बावची विद्यालय, परंडा चे संस्थापक अध्यक्ष मा. बिभिषण रोडगे सर यांना प्राप्त झालेल्या “राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६” निमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी शिवाजी केमदारने होते. प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, वसंत जगताप, महादेव माळी, विलास डांगे, दादासाहेब फुरडे…