धाराशिव / प्रतिनिधी येथील संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने जि. प.प्रशाला व प्राथमिक शाळा वडगाव सिद्धेश्वर येथील एकल पालक/ गरजू विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना शालेय साहित्याचे वितरण व मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाने पास झालेल्या तीन गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार दैनिक सामनाचे माजी जिल्हा प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी, आंबेडकर साखर…
धाराशिव / प्रतिनिधी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच दुसऱ्याच दिवशी धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नाने यश मिळाले असून राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल 18 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून नागरिकांच्या…
धाराशिव / प्रतिनिधी इंडिया को-ऑप क्रेडीट सोसायटी अल्पवधीत उत्तम कामामुळे यशस्वी वाटचाल करीत आहे. धाराशिव येथे मुख्यालय असलेल्या इंडिया सोसायटीच्या आता जिल्हाभर शाखा होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी सुहास पाटील यांनी केले. इंडिया को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या. या विशेष सभेस श्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.धाराशिव येथील इंडिया को-…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. अनिरुद्ध वनकर प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रम व जनसंपर्क अभियानासंदर्भात जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांचे पुष्पगुच्छ…
कळंब / प्रतिनिधी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कळंब चे पोलीस निरीक्षक शकील शेख व पथक हे कळंब पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करणे कामी दि. दि.22.06.2026 रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक शेकील शेख यांना गुप्त…
प.पू. आप्पाबाबा महाराज यांची उपस्थिती परंडा / प्रतिनिधी येथील ऐतिहासिक भवानीशंकर मंदिरातील दक्षिणमुखी काळामारुती मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा बुधवारी (दि. १७) अत्यंत धार्मिक, विधीवत आणि उत्साही वातावरणात पार पडला. “पवनसुत हनुमान की जय”, “बज्रंग बली की जय” अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यासाठी रुईभर येथील गुरुदेवदत्त आप्पाबाबा महाराज, श्रीक्षेत्र सोनारी येथील…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील गरीब निर्वासित कुटुंबांच्या अंधारमय जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांनी केले आहे. त्यांच्या स्वखर्चातून ४५ निर्वासित गरीब कुटुंबांना नवीन वीज कनेक्शन मोफत वीज मीटर तसेच परिसरात एअरबंच केबल व वीज खांब उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहळा २०…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील विविध नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेच्या बॅगा, वह्या, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. तसेच अन्नपूर्णा छत्र कार्यालय, धाराशिव येथे अन्नदान…
नळदुर्ग / प्रतिनिधी येथील जिल्हा परिषद प्रशाला या शाळेला बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या सीएसआर अंतर्गत शालोपयोगी साहित्य व वीस बाकड्याचे वितरण करण्यात आले.बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य नवीन मजबूत वीस बाकडे वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्यांची मदत केल्याने यातून हजारो विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपयोग होणार आहे.याप्रसंगी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील केआरजी KRG फाउंडेशन व विश्व निरामयम योगा क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक, उमरगा येथे सकाळी 7.30 वाजता आयोजित कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.यावर्षीच्या “Yoga for Healthy Ageing” या संकल्पनेनुसार योगाचे आरोग्यदायी महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात…