परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा येथे आज उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा २०२६ मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रामेश्वर हालगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील कु. संस्कृती देवकर, कु. सिद्धी गरड, कु. प्राप्ती सातपुते, कु. राजनंदिनी शिंदे, कु. तन्मय…
मुरुम ( म. नेता ) उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा तालुक्यातील तसेच कोराळ गावातील चालु असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर कामाच्या कुशल बिलाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी या मागणीचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी गुरुवार (दि.०९) रोजी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहरातील बालाघाट शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय परिसरात नजिकच्या काळात ‘सैनिक शाळा’ सुरू करण्याचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलून दाखविला आहे. या सैनिक शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सैनिकी शिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,युवक मोठ्या प्रमाणात देश सेवेसाठी तयार होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.…
उमरगा / प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, बौद्धिक क्षमता आणि सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने डॉ. रामानुजन इंग्लिश मीडियम स्कूल, उमरगा येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात गुरूवार दि. २ जुलै रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमास नगरपरिषद उमरगाचे मुख्याधिकारी सुंदर…
धाराशिव / प्रतिनिधी अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात सहज,प्रभावी आणि आत्मीयतेने मराठी भाषा वापरता यावी,यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ या उपक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे मंगळवारी (दि. ७ जुलै) व्यावहारिक मराठी भाषा शिकविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग,राज्य मराठी विकास संस्था,कोकण मराठी साहित्य परिषद आणि…
परंडा / प्रतिनिधी धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस एक वर्ष साधा कारावास व 3,50,000/- द्रव्य दंडाची परंडा येथील न्यायालयाचे सुनावली आहे. याबाबत भैरवनाथ शुगर वर्क्स लि.सोनारी यांच्यावतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की , फिर्यादी भैरवनाथ शुगर वर्क्स लि. शिवाजीनगर सोनारी या साखर कारखान्याने आरोपी हनुमंत मधुकर आगलावे रा. बावी (आ.) ता. बार्शी यांचे विरुध्द परंडा…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्राप्त ७६२९ शेतकऱ्यांची माहिती अपलोड धाराशिव / प्रतिनिधी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६ च्या माध्यमातून घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.दि.धाराशिव जिल्हा मध्यवर्ती…
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. डॉ. अरविंद विजय हंगरगेकर यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई – जिल्हा केंद्र धाराशिव येथे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रा. डॉ. हंगरगेकर यांनी शिक्षण…
धाराशिव / प्रतिनिधी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत मा. ओंकार देशमुख, उपविभागीय अधिकारी, धाराशिव तथा मतदान नोंदणी अधिकारी, धाराशिव यांनी कावलदरा, बावी व धारूर येथील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट दिली. क्षेत्रभेटीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाची उद्दिष्टे, Enumeration Form (EF) वितरण व संकलन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल तेर येथे सहशिक्षक अच्युत शिवराम हजगुडे यांच्या सेवापूर्ती निमित्त प्रशालेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड होते.प्रमुख पाहुणे म्हणून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ ,पत्रकार नरहरी बडवे ,श्रीराम इरकटे यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक बिभीषण…