Live News…..Breaking News!

.

  • गौर (वा) येथे मोफत पशुधन आरोग्य शिबीराचे आयोजनसिध्दीविनायक परिवाराचा उपक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गौर (वा.) येथे मोफत पशुधन आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबीराचे आयोजन श्री सिद्धीविनायक परिवार, धाराशिव, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (NDDB), राष्ट्रीय गोपालक जागृती अभियान व MSD पशु आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. धाराशिव जिल्हयात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी गौर…

  • १८ गायी, २३ शेळ्या, १० ० कोंबड्या दगावल्या : ६० लाखांचे नुकसान सर्वस्व गमावलेल्या दातखिळे कुटुंबाला बळ देणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टी आणि महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या भूम तालुक्यातील दातखिळे कुटुंबाला सर्वतोपरी बळ देण्याचा निर्धार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. पावसामुळे बाणगंगा नदीला आलेल्या पुरात तेलगाव पिंपळगाव येथील श्रीराम दातखिळे (वय ५५) यांच्या १८ गायी, २३ शेळ्या,१०० कोंबड्या वाहून गेल्या. २३ सप्टेंबर रोजी आलेल्या या संकटाने दातखिळे कुटुंबीय़ांचे ६० लाखाहून अधिक  रुपयांचे नुकसान झाले…

  • अतिवृष्टीग्रस्तांना भारतीय किसान संघाकडून चारा वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतच्यावतीनेधाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या पशुसंवर्धनासाठी वैरणीची अत्यावश्यक गरज होती , भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतांनी धाराशिव चे अध्यक्ष यांच्या देखरेखीखाली बाधीत शेतकऱ्यांना चार ट्रक वैरणीचे विविध गावांमध्ये वाटप करण्यात आले . दसऱ्याच्या दिवशी उपाशी जनावरांना भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते स्वतः सण साजरा करण्याचे सोडून…

  • जागजी येथील एनव्हीपी शुगरच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. हा कारखाना चाचणी व प्रथम हंगामात यशस्वी गाळप केल्यानंतर द्वितीय गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार, दि. 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परीक्षक संदीपान महाराज हासेगावकर आणि जनता बँकेचे…

  • धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा, खासदार ओमराजे निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश

    धाराशिव / प्रतिनिधी येथील बहुप्रतिक्षित केंद्रीय विद्यालयाला केंद्र सरकारकडून तत्वतः मंजुरी मिळाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, त्यांनी ही आनंदाची बातमी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. “पाठपुराव्याला यश..!”  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये “पाठपुराव्याला यश..!” असे म्हणत…

  • संघ शताब्दी निमित्त आज धाराशिव येथे संघ स्वंयसेवकांचे सदंड संचलन व विजयादशमी उत्सव

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व विजयादशमी दसऱ्याच्या उत्सवानिमित्त धाराशिव शहरात रविवारी सायंकाळी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शहरातील डायट काँलेज बार्शी नाका पासून सांयकाळी ५-३० विविध मार्गावरून संघ स्वयंसेवकांचे सदंड संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहतील परिमल मंगल कार्यालयात सायंकाळी ७-०० वाजता हा विजयादशमी उत्सव साजरा होणार असून या…

  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह हेक्टरी 50 हजार अनुदानासाठी तुळजापुरात काँग्रेसचे आंदोलन

    तुळजापूर / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयासह संपूर्ण राज्यातील व मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत शासनाने द्यावी तसेच फळबागांना एक लाख रुपये अनुदान द्यावे ,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी , एपीएल शेतकऱ्यांना पूर्ववत धान्य वाटप करावे आदीसह ईतर विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका…

  • स्वानंद महिला संस्था व बेदमुथा परिवाराच्यावतीने अतिवृष्टीग्रस्तांना मदत

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना विविध प्रकारची मदत करण्याचे काम विविध सामाजिक संस्थांच्या वतीने व दानशूर व्यक्तींच्या वतीने सुरू आहे या मानवतेच्या कामांमध्ये विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यामध्ये स्वानंद महिला संस्था कोथरूड पुणे व विनोदकुमार तिलोकचंद बेदमुथा आणि परिवार धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टी व पुरग्रस्तासाठी…

  • ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने पुरग्रस्तांसाठी २५ हजारांची मदतजिल्हाधिकार्‍याकडे सुपूर्द केला धनादेश

    धाराशिव / प्रतिनिधी येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ हजार रुपये देण्यात आले. या रक्कमेचा धनादेश नुकताच जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला.धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी तसेच पुरामुळे जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्ण वाया गेला असून, अनेक जनावरे वाहून गेली आहेत, अनेक घरांची पडझड…

  • शासकीय वैद्यकीय महाविद्या लय येथे मेंटल हेल्थ लॅब व छात्रमानस कक्षाचे उद्घाटन

    धाराशिव / प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे १ ऑक्टोबर २०२५ रोजी मेंटल हेल्थ लॅब व छात्रमानस कक्षाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान व वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. चौहान म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी तसेच मनोविकार विभागातील नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी उपलब्ध…