Live News…..Breaking News!

.

  • आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगहीअतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न ; भूम येथील भेटीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना केंद्र व राज्य शासनांतर्गत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्यासाठी काम सुरू केले आहे. ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्याचे केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून राहून भागणार नाही. शासनाच्या योजनांसोबत आपणही मदतीसाठी मोठा हातभार लावला पाहिजे. ‘मित्र’ या शासकीय संस्थेच्या माध्यमातून ‘क्राउड फंडिंग’ उभारून अतिबाधित कुटुंबांना थेट…

  • ओला दुष्काळ व शेतक-यांची कर्जमाफी नाही केल्यास रस्त्यावर उतरणार – मा. खा. राजू शेट्टी

    परंडा / प्रतिनिधी शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह राज्य ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरणार असा ईशारा राज्य सरकारला शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.माजी खासदार राजू शेट्टीहे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आज दि.३ ऑक्टोंबर रोजी परंडा तालुक्यात भोत्रा येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे…

  • दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ त्वरित मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    दिव्यांगासाठी शासकीय योजनांचा मेळावा धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून समाजातील शेवटच्या स्तरातील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.दिव्यांग बांधवांचे जीवन सुकर करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून,लाभार्थ्यांना तत्परतेने सुविधा मिळतील याची काळजी घेतली जाईल.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद, जिल्हा दिव्यांग…

  • काँग्रेसचे ओला दुष्काळ व इतर मागण्यांसाठी आंदोलन

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे, सोयाबीन, कांदा, उडीद, तूर, ऊस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी…

  • श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. चा पाचवा गाळप हंगाम प्रारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी शेतकरी बांधवांच्या अथक परिश्रम, सहकार्य आणि विश्वासामुळे तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.च्या कारखान्याचा पाचव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन मातोश्री श्रीमती मीनाताई काशिनाथराव कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करून करण्यात आले. या वेळी श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक…

  • पूरग्रस्त नागरिकांना शिवसेना तालुका प्रमुख लाकाळ यांंच्याकडून जीवनावश्यक किटचे वाटपबांधूया मदतीचे तोरण, जपूया शिवसेनेचे धोरण

    धाराशिव / प्रतिनिधी सध्या जिल्हाभरात अतिवृष्टी व ढग फुटी पाऊस आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तेरणा धरण भागात नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घराला पुराच्या पाण्याने घेरले होते. त्यामुळे पुराच्या तडाख्याने हाहाकार माजलेला आहे. अनेकांना खाण्यास अन्नाचा कण देखील शिल्लक राहिलेला नाही. अशा संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेने पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री…

  • धाराशिव साखर कारखान्याचा बाँयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात

    धाराशिव / प्रतिनिधी डीव्हीपी धाराशिव साखर कारखाना लि. चोराखळी ता. कळंब जि.धाराशिव या कारखान्याचा गाळप हंगाम सन 2025 -26चा 14 वा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम दिनांक 01/10/2025 रोजी सकाळी 10 वाजता ह भ प प्रकाश बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडलायावेळी प्रमुख उपस्थिती आमदार अभिजीत धनंजय पाटील,कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील तसेच संचालक रणजीत भोसले,…

  • अतिवृष्टी अनुदानासाठी केवायसी की अँग्री स्टिक नबंर याबाबत शासनाने स्पष्टता आणावी – अनिल जगताप

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी केवायसी करायची की ॲग्री स्टिक नंबर वर शासनाचे अनुदान मदत मिळणार याबाबत शासकीय धोरणात , शासनाने स्पष्टता आणावी. अशी मागणी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे. यावर्षी धाराशिव जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असून सरासरीच्या 161 टक्के इतका पाऊस झाला आहे आणि ठिकाणी जमिनी खरवडून…

  • जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेला चालवायला द्या ; जेणेकरून शेतकरी बांधवांना मदत होईलआमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अनेकांच्या शेतजमीन खरवडून गेली आहे.खरीप हातातून गेला आहे.अशा वेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बॅक सक्षम व्हायला हवी. धाराशिव जिल्हा बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी राज्य सहकारी बँकेला संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून शेतकरी बांधवांना सुरळीत कर्जपुरवठा सुरू होऊ शकेल. नागपूरप्रमाणे…

  • तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

    तुळजापूर  / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी  मातेचा सिमोल्लंघन सोहळा “आई राजा उदो, उदो ” ” सदानंदीचा उदो , उदो ” च्या गजरात व फुले आणि कुंकवाच्या उधळणीत संभळाच्या कडकडाटात  गुरुवार दि.२ आँक्टोंबर रोजी उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो” च्या जल्लोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक रिती रिवाजांनुसार साजरा करण्यात…