Live News…..Breaking News!

.

  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

    तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत अभिवादन केले.या कार्यक्रमास लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक पोलिस…

  • कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श; राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांमध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार राज्यात तिसरे

    धाराशिव   /  प्रतिनिधी कार्यालयीन मूल्यमापन अंतर्गत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. ही धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हाधिकाऱ्यांमध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत २०० पैकी १८५.२५ गुण प्राप्त…

  • पळसप गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आणि जिंकणार – लाकाळ

    धाराशिव   / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी अजित लाकाळ यांनी मुंबई येथील नंदनवन या शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी पळसप गटामधून निवडणूक लढणार असून तुमचे आशिर्वाद मिळायला पाहिजेत असे साकडे लाकाळ यांनी घातले. त्यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तू निवडणूक लढ, जिल्हा परिषदेच्या…

  • मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश

    मुंबई    /  प्रतिनिधी कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली.यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या,तसेच काही…

  • आध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचारणात आणावेत – माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत

    परंडा / प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत निष्ठावान शिवसैनिकांना डावलल्याचा राग म्हणून मी अपक्ष पॅनल उभा केले आहे . आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत भोळे आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचेसोबत बंड केले त्या काळात जे शिवसैनिक आपल्याशी एकनिष्ठ राहिले, पक्षासाठी आपल्यासाठी जीवाच रान केल ,त्यांना या निवडणूकीत वाऱ्यावर सोडले हे…

  • नळदुर्ग नगरपालिकेत विषय समित्यांचे गठन, विरोधी पक्ष काँग्रेसला दोन सभापती पदे

    नळदुर्ग / प्रतिनिधी येथील नगर पालिकेच्या विविध विषय समित्याच्या निवडी शनिवार (२४) रोजी पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करून समित्या गठीत करण्यात आल्या, समित्याचा एक वर्षाचा कार्यकाळ राहणार आहे. पालिकेची निवडणूक होवून सत्तेत आलेल्या भाजपचे नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयी समित्यांचे गठन वर्ष भराची मुदतीसाठी नियमानुसार पहिल्या सभागृह विशेष सभेत करण्यात आली,यासाठी…

  • धाराशिव नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध

    विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपालिकेच्या शहर विकासाशी संबंधित विविध विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या विशेष सभेत नगरपालिकेच्या महत्त्वाच्या समित्यांवर सभापती व अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. या निवड प्रक्रियेत आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय…

  • मलकापूर येथे अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    येरमाळा / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील मलकापूर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते पार पडला. येरमाळा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात समाविष्ट असलेल्या मलकापूर येथे रविवार दि. २५ रोजी आयोजित कार्यक्रमात…

  • अणदूर पंचायत समिती गणात. रणवीर चव्हाण यांचा विजयाचा मार्ग सुकर – किंगमेकर च्या भूमिकेकडे लक्ष..!

    अणदूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेचे संबोधल्या जाणाऱ्या अणदूर पंचायत समिती मतदारसंघात अनेकांनी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणवीर चव्हाण यांचा विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता जाणकारातून व्यक्त केली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणात चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मालक चव्हाण यांचे सुपुत्र रणवीर चव्हाण…

  • जि.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  खा. ओमराजे व, आ. स्वामी यांच्या झंझावती बैठका

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.प्रवीण स्वामी यांनी उमरगा व लोहारा तालुक्यात झंझावती बैठका सुरु केल्या आहेत. समुद्राळ ता. उमरगा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रवीण स्वामी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील, शरणप्पा वरनाळे , रजाकजी…