परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात चौरंगी बहुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. या जवळा ( नि ) गटात अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दि २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. अपक्ष उमेदवार धनंजय सावंत व शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस…
कळंब / प्रतिनिधी शिवसेना(उबाठा ) गटाला बाजूला ठेवत काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार ) पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन केल्याने कळंब तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्ष एकत्र आल्याने निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे. जिल्हा…
परंडा / प्रतिनिधी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. रामचंद्र गेनुजी शिंदे यांची पत्नी कुसुमताई शिंदे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. तुळजापूर येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या स्मृतीस श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संस्थेच्या व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा…
धाराशिव / प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. घटनेच्या वृत्तानंतर २८ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.त्यांनी आपल्या भावना…
परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील धाडसी निर्णयक्षम नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस हार घालून भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, युवा नेते…
तेर ( म. नेता ) थोडसरवाडी ता.धाराशिव येथील दिपाली काकासाहेब थोडसरे यांना सन २०२६ चा कै. डॉ. चंद्रकलादेवी पाटील स्मृती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या धाराशिव येथील मंजिरी सखी शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत असून, महिला सक्षमीकरण, शाश्वत व सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय तसेच सामाजिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय योगदान…
कळंब / शहर प्रतिनिधी फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘किसान मित्र कृषी प्रदर्शन 2026’ अंतर्गत ऊस परिषद उत्साहात पार पडली. शेतकरी सक्षमीकरण, उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या मुद्द्यांवर या परिषदेत सखोल चर्चा झाली. परिषदेस नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील दळवी, सामाजिक…
धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे कर्तबगार धडाडीचे उपमुख्यमंत्री, सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व , विकासासाठी रोखठोक भूमिका घेणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांची सासरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली. अनेकांचा या वृत्तावर विश्वास बसत नव्हता, विमान अपघातात त्यांच्या निधनाचे वृत्त विविध वृत्तवाहिन्यांवर…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनाला वेदना देणारी आणि काळजाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना असून, अजितदादा आपल्यातून इतक्या लवकर निघून जातील, असे स्वप्नातही वाटले नव्हते.गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रभावी नेतृत्व करत होते. परखड विचार, स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणे रोखठोक मत मांडण्याची त्यांची शैली सर्वश्रुत होती. चुकीला…
आज मन अतिशय अस्वस्थ आहे. कै. अजित पवार यांच्या निधनाच्या दुर्दैवी बातमीने अंतर्मन व्यथित झालं आहे. मेहुणे म्हणून आमचं नातं केवळ कौटुंबिक नव्हतं, तर विश्वास, आपुलकी आणि परस्पर आदराचं होतं. मंत्रिमंडळात एकत्र काम करताना त्यांच्या कार्यक्षमतेचा, ठाम निर्णयक्षमतेचा आणि राज्यासाठीच्या तळमळीचा अनुभव मी स्वतः अनेकदा प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, सहकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांवर…