Live News…..Breaking News!

.

  • माजी आमदार राहुल मोटे यांनी घेतले भैरवनाथाचे दर्शन ; डोंजा गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा केला शुभारंभ

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुमधडाका सुरू झाला असून ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या पाच गटासाठी आणि पंचायत समितीच्या दहा गणासाठी सुरू आहे. आज दि १ फेब्रुवारी रोजी सोनारी तीर्थक्षेत्र येथील भैरवनाथाचे दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांनी डोंजा गटातील उमेदवार भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे , सोनारी गणातील…

  • निखील हुंडेकर यांची भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदी निवड

    धाराशिव / प्रतिनिधी येथील युवा कार्यकर्ते निखील सुनिल हुंडेकर यांची धाराशिव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी दिले आहे. मुळ तुळजापूर येथील असलेले निखील हुंडेकर हे एमबीए फायनान्स असून, 2013 पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम…

  • जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकवा – बसवराज पाटील

    भुसणीतून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचाराचा शुभारंभ मुरूम ( म. नेता) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ उमरगा तालुक्यातील भुसणी येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ शुक्रवारी (ता.३०) रोजी करण्यात आला. याप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, सध्या राज्यावर उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या…

  • तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,  येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमास श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त तहसीलदार तथा व्यवस्थापक मा. श्रीमती माया माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील मेहनत, शिस्त…

  • मिनी मंत्रालयाच्या निवडणूकीसाठी कळंब तालुक्यात मोठी चुरसनिवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र झाले स्पष्ट

    कळंब / किरण राजपूत कळंब तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकीमधून १८४ उमेदवारांनी माघार घेतली असून महायुती एकत्र तर आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख तालूका म्हणून कळंब तालुक्याकडे सर्वच पक्षातील नेत्याचे विशेष लक्ष असल्याने ही निवडणूक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिष्ठिची आहे . कळंब तालुक्यात ८ जिल्हा परिषद गटामध्ये…

  • धारूर-उपळा भागात प्रा. नितीन बानगुडे पाटील  आणि खा. ओमराजे निंबाळाकर यांचा प्रचाराचा झंझावत

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धारूर आणि उपळा भागात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार ओमराजे निंबाळाकर आणि प्रख्यात व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधून विजयाचा निर्धार व्यक्त केला.यावेळी सभेला…

  • तानाजी सावंत म्हणजे अवकाळी पाऊस – मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची टिकादेवगाव येथे भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा सध्या उडत आहे. गुरुवार दि 29 रोजी लोणी गटातील व लोणी व वडनेर गणातील उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ देवगाव येथील महादेव मंदिरात भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला . यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी परंडा मतदारसंघाचे शिंदे गटाचे…

  • भूजल व्यवस्थापनासाठी माहितीचा प्रभावी वापर अत्यावश्यक – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    केंद्रीय भूजल विभागाची कार्यशाळा धाराशिव / प्रतिनिधी भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे.केंद्रीय भूजल विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (GSDA) डेटाबेसचा समन्वित व व्यापक वापर करून जिल्हास्तरीय नियोजन अधिक परिणामकारक करता येईल. गावपातळीवरील जलसुरक्षा आराखडे, पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी ही माहिती…

  • ईव्हीएम हाताळणी बाबतचे कर्मचा-यांचे व्दितीय प्रशिक्षण संपन्न

    103 गैरहजर कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद व धाराशिव पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी मतदान प्रक्रिया व ईव्हीएम (EVM) हाताळणीबाबत बाबतचे द्वितीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगरपरिषद धाराशिव येथे घेण्यात आले,…

  • परंडयात सर्व पक्षीयांनी वाहिली अजितदादांना श्रध्दांजली

    परांडा / प्रतिनिधी परंडा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार यांच्या पवित्र स्मृतीस सर्वपक्षीयांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील बावची चौक येथील अनुपसिंह सद्दिवाल ( पवार) कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता.यावेळी ॲड. दादासाहेब खरसडे, जनार्दन मेहेर, ॲड.संदिप पाटील,उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर, विकास कुलकर्णी, पोपट गटकुळ, भाऊसाहेब खरसडे, राहुल बनसोडे,…