धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव, अक्षरवेल आणि ब्रम्हा कुमारी परिवार यांच्यातर्फे वडगाव (सि.) येथे कवयित्री बी सुरभी यांच्या मोरपीस व अवघा रंग या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा अगदी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे होते तर…
मुरुम ( म. नेता ) मौजे.माडज ता.उमरगा येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी 2024 साली तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना व मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे 2515 या योजनेअंतर्गत 40 लक्ष रुपये निधी मंजूर झालेला होता. या कामाचे भूमिपूजन गुरुवार दि.०२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मा.आ.ज्ञानराज…
परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील पुरातन भवानी शंकर मंदिरातील काळा मारूतीची चैत्र पौर्णिमा हनुमान जन्म उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त गुरुवार दि.२ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.पहाटेपासुन नागरीकांनी,महिलांनी दर्शनासाठी मंदीरात गर्दी केली होती.हनुमान जन्मोत्सवानिमित्त , पहाटे विधीवत पंचोपचार, अभिषेक पूजा करुन सुर्योदयी गुलाल उधळून सकाळी ६ वाजुन ३३ मिनिटाला आरती करुन उत्साहात…
परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व धाराशिव जिल्हा परिषदचे समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. श्री. ठाकूर यांनी सभापती श्री. कोकणे यांचा फेटा बांधून व शाल व पुष्पहार देऊन सत्कार व…
नळदुर्ग / प्रतिनिधी सिने अभिनेता अजय देवगन यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग शहरांमध्ये अजय देवगण फँन्स शंकर वाघमारे यांनी शास्त्री चौक येथे पाणपोई सुरू केली आहे. पाणपोईचे हे 25 वे वर्ष आहे. या पाणपोईचे उद्घाटन नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुमन ठाकुर,माजी नगरसेवक विनायक अहंकरी, दत्तात्रय वाघमारे, सरदार सिंग ठाकूर,…
कळंब / प्रतिनिधी कळंब शहरातील कसबा पेठ येथे जय हनुमान तालीम संघाच्यावतीने हनुमान जयंतीचे औचित्य साधून दि. २ एप्रिल २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश देत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. एक तासात ९ रक्तदात्यांनी…
धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत सादर करण्यात आलेल्या १ महिन्याच्या अहवालानुसार, राज्यात अवैध…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे माजी धाराशिव जिल्हाध्यक्ष मा.संताजी चालुक्य-पाटील यांचे वडील दत्तात्रय (राजेसाहेब) यांचे अल्पशा आजाराने काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. मुळज, ता. उमरगा येथील त्यांच्या निवासस्थानी आज आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन चालुक्य-पाटील परिवाराचे सांत्वन केले व चालुक्य कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी नितीन काळे, संताजी चालुक्य , अभय चालुक्य , माधव…
धाराशिव / प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले आहे.तीन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरायच्या आतच काल झालेल्या पावसाने तुळजापूर,लोहारा यासह अनेक…
धाराशिव / प्रतिनिधी गौण खनिज व जमीन महसूल वसुलीमध्ये धाराशिव तहसील कार्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. शासकीय जमीन महसूलात 143.98% तर शासकीय गौण खनिजात 97.66% उद्दिष्टपूर्ती तहसील कार्यालयाने केली आहे सन 2025–26 या आर्थिक वर्षाअखेर (दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत) प्राप्त झालेल्या अधिकृत महसूल वसुली अहवालानुसार, धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालय धाराशिव यांनी शासकीय महसूल संकलनात…