Live News…..Breaking News!

.

  • तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात अन्नछत्र सुरू

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने १६ एप्रिल पासून अन्नछत्रास प्रारंभ करण्यात आला आहे. श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दुपारी बारा ते दोन व सायंकाळी सात ते नऊ पर्यंत हे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. भाविकांसाठी हा…

  • यमगरवाडी प्रकल्पातील सेवाव्रती गोविंद सोमाणी व सुमन सोमाणी यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न.

    धाराशिव / प्रतिनिधी नांदेड येथील गोविंद सोमाणी आणि सौ. सुमन सोमाणी हे यमगरवाडी विद्या संकुलात तीन वर्षे सेवाव्रती म्हणून सेवा देत होते. नांदेड येथे त्यांचा प्लायवूड चा मोठा व्यवसाय आहे. मोठा परिवार आहे. खूप मोठा व्याप असतानाही त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघामार्फत चालणाऱ्या सेवा कार्यासाठी वेळ द्यायचा असे त्यांनी ठरवले. परिवाराचा त्याग करून पूर्णवेळ काम करायचे…

  • जि. प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी घेतले सोनारीच्या काळभैरवनाथाचे दर्शन

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळ भैरवनाथाच्या यात्रेतील रथोत्सव बुधवारी पार पडला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यासह ईतर राज्यातील हजारो भाविक उपस्थित होते. या यात्रा उत्सवानिमित्त धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी सोनारी येथे जाऊन श्री काळ भैरवनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा यात्रा कमिटीच्या वतीने…

  • पाडोळी (आ) येथील जनता दरबारास नागरिकांंचा प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी आमदार राणाजगजितसिह पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाडोळी (आ) ता. जि. धाराशिव येथे पंचायत समिती गणातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. हा जनता दरबार धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रशांत तात्या रणदिवे , जि प सदस्य दयानंद शिंदे, तसेच परिसरातील सरपंच,…

  • धाराशिव ‘माविम’ची राज्यात ऐतिहासिक झेप; प्रथमच पटकावला दुसरा क्रमांक​३७ कोटींचे विक्रमी कर्जवाटप; महिला सक्षमीकरणात जिल्ह्याचा नवा पॅटर्न — आमदार राणाजगजितसिंह पाटील 

    धाराशिव / प्रतिनिधी महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा कणा असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) धाराशिव जिल्हा कार्यालयाने २०२५-२६ या वर्षात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून नवा इतिहास रचला आहे. सन मागील २९ वर्षांत पहिल्यांदा सांघिक कामगिरीच्या जोरावर ‘माविम’ने ही मोठी झेप घेतली आहे. यामुळे जिल्ह्याचा महिला. सक्षमीकरणाचा नवा पॅटर्न आता राज्यासमोर आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह…

  • धाराशिव पंचायत समिती सभापती व उपसभापती च्या जनता दरबारास जनतेचा प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधींनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम व उपसभापती प्रमोद पाटील यांनी गण निहाय जनता दरबार उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यास ग्रामीण भागातील नागरिकांंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांंच्या समस्या जागेवरच मार्गी लागत असल्याने या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पळसप येथे धाराशिव पंचायत समिती सभापती सौ…

  • नांदेडला पिक विम्यापोटी 813 कोटी तर जिल्ह्याला किती व कधी?

    तांत्रिक उत्पादनावर नको तर पिक कापणी उत्पादनावरच विमा देण्याची आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा पीक कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादन असे निकष लावले आहेत. तांत्रिक निकषाचा आधार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात…

  • काल्याच्या कार्यक्रमानंतर दिंडया तेरहुन गावाकडे मार्गस्थ

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मुख्य काल्याचा कार्यक्रमानंतर दिंडया आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या. काल्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री संत गोरोबा काका व श्री नृसिंह यांची भेट संपन्न झाली.श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे मुख्य काल्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हभप विवेकानंद महाराज गोसावी ( पंढरपूर),हभप थोबडे महाराज (वाशी),हभप महेश महाराज…

  • पाडोळी (आ) ते टाकळी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अँड. व्यंकट गुंड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी परळी ते अक्कलकोट या राज्य मार्गावरील पाडोळी (आ) ते टाकळी या रस्त्याची अत्यंत खराब झालेली अवस्था लक्षात घेऊन तात्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. व्यंकट गुंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेही याबाबत निवेदन सादर करण्यात…

  • आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव ‘भीममय’भाजपाच्या भीम महोत्सवाला जनसागराचा प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव नगरीत क्रांतीच्या सुरांचा अभूतपूर्व सोहळा रंगला. महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे यांच्या बुलंद आणि थरारक आवाजाने संपूर्ण जिल्हा परिषद मैदान दणाणून गेले. निमित्त होते, आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेतून मल्हार पाटील आणि सौ. साक्षी…