धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलत, इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. बदलत्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार आणि सक्षम शिक्षण मिळावे, यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील बावी, धारूर या ठिकाणी मंगळवारी गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी आमदार कैलास पाटील यांनी केली. केळी, आंबा बागा ,ज्वारी व इतर पिकांच प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आ.पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्याभरामध्ये अनेक…
अणदूर. ( म. नेता. ) तुळजापूर तालुक्यात बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता विजेच्या कडकडाट, सुसाट वादळी वारा व अवकाळी पावसाने कहर केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे बळीराजा संपूर्णपणे उध्वस्त झाला असून शासन मदत करते का याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.संपूर्ण तालुक्यात आज दिनांक 22 रोजी सायंकाळी अवकाळीने बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेले गहू-…
धाराशिव / प्रतिनिधी जुन्या पेन्शन योजनेसह रिक्तपदाची तात्काळ भरती करणे , कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, वेतन व भत्त्यातील विसंगती दूर करावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारीकर्मचाऱ्यांनी काल मंगळवारपासून संपूर्ण राज्यभरात काम बंद आंदोलन म्हणजे संप पुकारला आहे. या संपामध्ये महसूल कर्मचाऱ्यांसह, आरोग्य कर्मचारी व इतर अनेक शासकीय विभागातील कर्मचारी…
खा. शिवाजीराव काळगे धाराशिव / प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी आणलेले ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक हे केवळ पश्चिम बंगालसह इतर पाच राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी आणले होते. मूळात भाजपला महिलांना आरक्षणच द्यायचे नाही. महिला आरक्षणाच्या आडून परीसिमन ( डिलिमेटेशन ) विधेयक संसदेत पारित करण्याचा घाट भाजपाने घातला होता…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कहर करत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. मंगळवारी (दि. २१) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागांना झोडपून काढले, तर काही ठिकाणी गारांचा अक्षरशः खच साचल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे तसेच काढून ठेवलेले पिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. धाराशिव तालुक्यातील तेर, ढोकी, येडशी,…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील शिवाई प्रतिष्ठान यांच्यावतीने श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे., स्क्रीनकडून वाचन लिखान संस्कृतीकडे. या उपक्रमांतर्गत शिवाई प्रतिष्ठान धाराशिवच्या महिलांनी एकत्रित येऊन श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील १२० विद्यार्थ्यांनां छोट्या वह्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना सुट्टीमध्ये वाचण्यासाठी गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (दि. १२ मे) धाराशिव येथील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.पाडोळी (आ.) या गावातून उभा राहिलेला गुंड परिवार गेल्या चार दशकांपासून सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी कामगिरी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई रवींद्र गायकवाड यांनी बुधवार ता.२२ रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेस भेट दिली. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या समायोजनेस विरोध करत पालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जि.प. उपाध्यक्षांनी शाळेत भेट दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी उषाताई गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वर्गास भेटी दिल्या. या भेटी…