Live News…..Breaking News!

.

  • भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे ओबीसींची फरपट – भिंगेकाँग्रेसच्या ओबीसी संवाद दौऱ्यास प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने ओबीसी घटकांची फरफट चालविली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी ४६ महामंडळे काढली. परंतू, त्यासाठी अध्यक्षांचा पत्ता नाही, ऑफिसचा पत्ता नाही आणि निधीचा देखील पत्ता नाही. अहिल्यादेवी होळकर यांना एका बाजूला धर्मरक्षणी म्हणायचं आणि अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये बांधलेला मनकर्णिका घाट बुलडोजर लावून पाडायचा असे धोरण भाजपचे आहे. धनगर आरक्षण मागणीसाठी आंदोलन…

  • मलकापूर साठवण तलावात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; मठ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह

    येरमाळा / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील मलकापूर येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त मंदिर मठाजवळील साठवण तलावात रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मठ व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मृत मुलाचे नाव रुद्र संतोष धुमाळ (वय १५, रा. अंबाजोगाई)…

  • एमपीएसी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रणव जाधव व निखिल मस्के यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील देवसिंगा या छोट्याशा गावातून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर उंच भरारी घेणारा तेजस्वी तारा – प्रणव नरसिंग जाधव आणि गंधोरा गावाचा अभिमान निखिल लिंबराज मस्के या दोन एमपीएसी परीक्षेत उज्वल यश मिळविलेल्या गुणवंत युवकांचा सत्कार मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अथक परिश्रम, जिद्द आणि अटळ चिकाटीच्या जोरावर…

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस मतिमंद विद्यार्थ्यांसोबत साजरातुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी समाजाभिमुख उपक्रम राबविला. अनावश्यक खर्चाला फाटा देत धाराशिव येथील स्वाधार मतिमंद शाळेमध्ये मतिमंद विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सर्व…

  • श्रीमद् भागवत कथा सोहळ्याची गाथा मिरवणुकीने व गोपाळ काल्याने सांगता.

    मुरुम ( म. नेता ) उमरगा तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथिल सद्भक्त मोहनराव कृष्णाजी व सौ.भारताबाई मोहनराव गायकवाड हे दांपत्य चारधाम यात्रा दर्शन सोहळा केल्यामुळे चारधाम यात्रा मावंदे यानिमित्ताने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे दि.१९ ते २५ रोजी पर्यत स्वगृही आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प.कैवल्य(भाऊ महाराज) चातुर्मास्ये पंढरपूरकर याची सुदंर कथा भाविक भक्तांसमवेत…

  • ज्ञानोद्योग विद्यालयातील तीन विद्यार्थीनी एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र

    येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाच्या तीन विद्यार्थीनींनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढविला आहे. कु. मयुरी मारुती बारकुल, कु. प्रतिमा सुखदेव गायके आणि कु. पायल बालाजी काळे या तीनही विद्यार्थीनींनी NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेचे…

  • खा. ओमराजे यांच्या सहकार्यातुन धाराशिवमध्ये आज ‘भव्य रोजगार मेळाव्या’चे आयोजन नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार दिलीप सोपल ,आमदार कैलास दादा पाटील, आमदार प्रवीण स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुणाल ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी धाराशिव शहरात एका भव्य ‘मोफत रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले…

  • माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी धाराशिव गुन्हे शाखेने केली 24 तासात जेरबंद

    धाराशिव / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे 25 एप्रिल रोजी च्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुंभेज येथील कॅनॉलच्या बाजूला असलेल्या माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप यांच्या शेत वस्तीवरील घरासमोर बाजावर विश्वनाथ जगताप व त्यांची पत्नी झोपलेली असताना काही अज्ञात दरोडेखोराने विश्वनाथ जगताप यांच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील…

  • तेरणा नदीत पोहायला गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला

    तेर / प्रतिनिधी पोहायला गेलेल्या इसम पाण्यात बुडाल्याची घटना धाराशिव तालुक्यातील तेर येथे २४ एप्रिलला सकाळी बाराच्या दरम्यान घडली. पाण्यात बुडालेल्या इसमाचा शोध राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथक कसून शोध घेत होते.त्यानतर इंदापूर येथील स्कूबा डायव्हर पथकाला पाचारण केल्यानंतर ३० तासानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान मृतदेह सापडला. धाराशिव तालुक्यातील तेर येथील अमरनाथ लक्ष्मण देवकुळे( वय ४०)…

  • टेबल टेनिस स्पर्धेत स्वदीप नवले चे सुयश

    धाराशिव / प्रतिनिधी बार्शी येथे रोटरी ओपन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या ओपन टेबल टेनिस स्पर्धेत धाराशिव येथील खेळाडू स्वदिप नवले याने भाग धेऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल धाराशिव जिल्हा क्रीडा मंडळाच्या वतीने कोच विल्सन दलभंजन, सिद्धेश्वर बेलुरे व सर्व टेबल टेनिस खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे. स्वदीप…