Live News…..Breaking News!

.

  • शिक्षणातून विकासाची नवी वाटचाल – पायाभूत सुविधा, गुणवत्तावाढ आणि विद्यार्थी कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सन २०२५-२६ या कालावधीत प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कामगिरी नोंदवली आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्यातील शाळांसाठी २०४ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच ११४ मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह बांधकामासाठी एकूण ३,३६२.८० लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील…

  • वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

    धाराशिव,दि.२८ एप्रिल (जिमाका) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून भारतीय हवामान खात्याने एप्रिल महिना तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून उष्माघात प्रतिबंधक आणि उपचारात्मक उपाययोजनांसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी…

  • पत्रकारास जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करणा-या विरोधात जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेवकांची मागणी

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारास दमदाटी करून जातीवाचक बोलुन शिवीगाळ करत अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या श्री जगदीश सोंडगे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्याधिकारी नगर परिषद परंडा, नगराध्यक्ष नगर परिषद परांडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . घनकचरा व्यवस्थापन परिस्थिती…

  • परदेशात उच्चशिक्षण व उत्तम पगाराच्या  संधी! या विषयावर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित.

    धाराशिव / प्रतिनिधींनी आज बी फार्मसी उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना परदेशामध्ये पदव्युत्तर शिक्षण  व त्याचबरोबर चांगल्या पगाराच्या नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध आहेत.या बाबींचा विचार करून तेरणा ट्रस्टच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभागातर्फे नुकताच  एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये ‘हायर एज्युकेशन स्टडीज इन फार्मास्युटिकल सेक्टर इन अब्रॉड’ (परदेशातील औषधनिर्माणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण व करिअर) या विषयावर चर्चा…

  • धाराशिवमध्ये शिवभक्त आक्रमक; धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीबागेश्वर बाबाला कोल्हापुरी चप्पलने मारहाण केल्यास शिवभक्त देणार १ लाख ५१ हजारांचे बक्षीस

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरातील शिवभक्त आज आक्रमक झाले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर) यांच्यावर देशद्रोहासह कठोर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवभक्तांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे अधिष्ठान असून त्यांच्या विषयी होणारा प्रत्येक अवमान हा…

  • सागरी जलतरण स्पर्धेत तेरणा अभियांत्रिकी च्या श्रावणी पांडुरंग रणखांब हिने पटकावले रौप्य पदक

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना मान्यताप्राप्त ९ व्या सरखेल कान्होजी आग्रे खुल्या सागरी जलतरण स्पर्धा २०२६ मध्य धाराशिव जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपट  कु. श्रावणी पांडुरंग रणखांब हिने ५ किमी अंतर ५१ मिनिटे २१ सेकंद या वेळेत पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला व रौप्य पदकाची मानकरी ठरली. यापूर्वी हि २० नोव्हेंबर २०२५ रोजी…

  • विश्व बंजारा दिनानिमित्त महिला भगिनींसाठी सांस्कृतिक अभ्यास दौरा

    तुळजापूर / प्रतिनिधी विश्व बंजारा दिवसा निमित्त धाराशिव जिल्ह्यातील महिला भगिनींसाठी सांस्कृतिक जतन आणि परंपरेची ओळख अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने    मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते मल्हार पाटील यांच्यावतीने नांदेड गुरुद्वारा, रेणुकादेवी, पोहरादेवी, बणजारा विरासत भवन येथे भव्य दर्शन व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.…

  • आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उभारण्याचे मोठे काम सुरू आहे.कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहत असलेल्या रुग्णालये, क्रिटिकल केअर युनिट्स आणि आधुनिक प्रयोगशाळांमुळे केवळ उपचारच नव्हे,तर हजारो रुग्णांना आशा निर्माण होत आहे.ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी,या उद्देशाने…

  • जागजी येथील जनता दरबारास नागरिकांंचा प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी जागजी तालुका धाराशिव येथे धाराशिव पंचायत समितीच्या सभापती सौ . गोकर्णा गोपाळ कदम यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पळसप गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ ,जागजी गणाचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग सावंत , पळसप गणांचे सदस्य विशाल…

  • अभाविप धाराशिव शाखेच्यावतीने व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव शाखेच्या वतीने दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय येथे एक दिवशीय व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन प्रमुख वक्ते प्रा.सोमनाथ लांडगे ,शहराध्यक्ष प्रा. प्रशांत गुरव , शहर मंत्री कु. साक्षी पाटील, सायबर पोलीस लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात…