Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव पालिकेचा शहरवासियांना दिला दिलासाअभय योजनेचा कालावधी वाढविलासर्वसाधारण सभेत महत्त्वाच्या विविध विषयांना मंजुरी 

    धाराशिव /प्रतिनिधी धाराशिव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाच्या विषयांना मंजुरी दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहाताई राहुल काकडे यांनी वसुली संदर्भात शासनाने खास नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेचा कालावधी वाढविण्याचा मंजूर करून घेतला आहे. तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे व वाहनतळासाठी अर्धा एकर जागा केली आहे. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे…

  • ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार 

    धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार आहे . मुंबई येथे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी त्यांनी अधिकृत निमंत्रण दिले यावेळी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण हि सुनेत्राताई यांच्या हस्ते संपन्न झाले, लोकनेते अजितदादां पवार साहित्यनगरीत…

  • धाराशिवमध्ये ‘नोकरी मेळाव्याला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

    धाराशिव / प्रतिनिधी येथील समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला भव्य ‘नोकरी मेळावा’ अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यां व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना नोकरी आणि करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी…

  • माझं गाव,आरोग्य संपन्न गाव” अभियान : १ मे रोजी जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा उपस्थित राहण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

    धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने “माझं गाव,आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानास मंजुरी दिली आहे.लोकसहभागावर आधारित ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली असून १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वी…

  • नागरिकांना वेळेत सेवा देणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी

    प्रत्येक तालुक्यात आदर्श सेतू केंद्र उभारणार ; सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे प्रतिपादन धाराशिव / प्रतिनिधी शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा वेळेत,पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी…

  • धाराशिव जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा; तातडीने उपाययोजना करावी –  डॉ. प्रतापसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( श.प.) जिल्हाध्यक्ष  डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की , मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याने पिकांच्या वाढीवर…

  • डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेस प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी महामानव, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आयोजित करण्यात आलेल्या प्रश्न मंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिव शहरातील कुरणे नगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माजी जिल्हाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, सुलक्षणा टिळक, शिक्षक प्रदीप नलावडे, मिलिंद जानराव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा…

  • जळकोट येथे लांडग्याच्या हल्ल्यात ८० शेळयांचा मृत्यू , मेंढपाळास आ. राणादादांनी दिले मदतीचे आश्वासन

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात जळकोट येथील मेंढपाळ बांधवांचे ८० शेळ्याचा लांडग्याच्या हल्ल्यात दुर्दैवी बळी गेल्याची घटना सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 1-00 वाजता घडली. याबाबत माहिती अशी की , जळकोट शिवारातील मेंढपाळांनी आपल्या शेळया शेतात बसवण्यासाठी नेल्या तर काही शेळ्या शेडमध्ये बांधल्या या शेळयांवर लांडग्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला .…

  • पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणी नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणीपरंडा तालुक्यात पत्रकारांकडून मुजोर कर्मचाऱ्याचा निषेध

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील पत्रकाराला फोनवर अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबन करावे, अशी जोरदार मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवार (दि. २८) रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, मंगळवार पेठेतील मुजावर गल्ली परिसरात मागील…

  • भैरवनाथ शुगर सोनारी चा रोलर पूजन उत्साहात

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.युनिट नं.१ या साखर कारखान्याचा हंगाम 2026 – 27 या हंगामाचे रोलर पूजन श्री राजेश शेळके व कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे यांच्या शुभहस्ते दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. परंडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे चेअरमन…