विज्ञान शाखेतून प्राची सातपुते प्रथम कला शाखेतून नंदिनी मोरे प्रथम तर वाणिज्य शाखेतून माधुरी शिंदे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 मधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परीक्षेत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे महाविद्यालयाचा एकूण 88.66% निकाल लागला…
धाराशिव / प्रतिनिधी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं.कृषी विभागाकडून सादर करण्यात येत असलेल्या पीपीटी प्रेझेंटेशनदरम्यान आमदार पाटील यांनी खरीप २०२५ मध्ये शेतकरी गटांना वितरित करण्यात आलेल्या कृषी निविष्ठांबाबत सविस्तर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्याकडे मागितली. परंतु ही…
१६ मे पासून घरगणनेला होईल सुरुवात परंडा / प्रतिनिधी देशाच्या सोळाव्या जनगणनेच्या तयारीला महाराष्ट्रसह जिल्हाभरात आता वेग येणार असून , ही संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे . नगरपालिका प्रशासन परंडा यांनी या मोहिमेची घोषणा केली. दि . 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने जनगणना 2027 अन्वये शासनाच्या मार्गदर्शक सूचना अनुसार दि 01…
परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील १ मे रोजी भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मंडई पेठ, भीम नगर रेवणी येथे साजरी करण्यात आली. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या हस्ते दीप , धूप व पुष्प वाहुन करण्यात आले.यावेळी भीम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक रत्नकांत…
धाराशिव / प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रवाणी अंतर्गत मोजे दारफळ येथील आरोग्य उपकेद्र नवीन इमारत लोकार्पण सोहळा उद्घघाटन मा.प्रदीप शिंदे जि.प. सदस्य , पंचायत समिती प्रशांत रणदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवींद्र जाधव , रणजीत इंगळे, सचिन जाधव, शशिकांत इंगळे. प्रमोद पाटील, अण्णासाहेब चव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रवाणी येथील वैद्यकीय…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपालिकेकडून आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधने भेट देवुन स्वागत करण्यात आले. यामध्ये प्राथमिक स्वरुपात ५ सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधने नगरपरिषद अध्यक्षा नेहा राहुल काकडे , मुख्याधिकारी निता अंधारे यांच्या हस्ते शेख गाझीमिया , पूजा वाळा, शेख मुस्तफा, संगीता वाळा, राजन…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज १ मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलिस अधीक्षक…
पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी आज ‘मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब’ सारख्या अत्याधुनिक सुविधांविषयी बोलताना अत्यंत आनंद होत आहे.आरोग्य क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेली प्रगती ही आपल्या समाजासाठी मोठी देणगी आहे.आजच्या काळात आजारांचे निदान जितके लवकर आणि अचूक होईल,तितके उपचार अधिक प्रभावी होतात.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक पर्वापासून राज्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी घरबसल्या डिजिटल स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली दिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात जनगणना-२०२७ चा टप्पा क्रमांक १ सुरू होत आहे.केंद्र…
धाराशिव / प्रतिनिधी आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविणे हीच प्रगतीची खरी दिशा आहे.नव्याने उभारलेल्या आरोग्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,तर ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून प्रत्येक गाव निरोगी,सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प शासनाने हाती घेतला आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे रोजी जिल्हा नियोजन…