Live News…..Breaking News!

.

  • दुधनाळ येथे तीन लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री शिव महापुराण कथेची सुरुवात…

    आंतरराष्ट्रीय शिव कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचा पहिला दिवस उमरगा   /  प्रतिनिधी  उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित केलेल्या श्री शिव महापुराण कथेची सुरुवात तीन लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कथा वाचक  पं. प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिव कथेची सुरुवात बुधवार दि. २७ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत…

  • सुजितसिंह ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन

    धाराशिवच्या भाजपा नेत्यांची महसूल मंत्र्यांकडे जोरदार मागणी परंडा    /  प्रतिनिधी मराठवाडयाच्या हक्काचे पाण्याचा प्रश्न असो की,  धाराशिवचे स्वतंत्र विद्यापीठ , महामार्गाचे जाळे , औद्योगीकरण आदि विविध विषयांवर विधिमंडळात आवाज उठविणारे व भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चांदा ते बांदा पर्यतच्या  कार्यकर्त्यांचे संघटनात्मक जाळे विणणारे विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भाजपा…

  • आठवी पास तरुणाची गणितातील अफाट बुद्धिमत्ता; तुळजापुरातील अविनाश जमादार ठरतोय चर्चेचा विषय

    अविनाश जमादार मानवी कॅल्क्युलेटर  तुळजापूर  /  प्रतिनिधींनी तीर्थक्षेत्र तुळजापुरातील पापनास नगर परिसरात वास्तव्यास असलेला अविनाश सुधीर जमादार हा तरुण  अवघा आठवी पास असला तरी त्याच्या गणितातील अफाट ज्ञानामुळे सध्या शहरात तो चर्चेचा विषय ठरत आहे. अत्यंत कठीण आकडेमोड क्षणार्धात सोडविण्याची क्षमता असलेल्या अविनाशच्या बुद्धिमत्तेने अनेकजण अचंबित होत आहेत. सामान्य शिक्षण घेतलेल्या या तरुणाची गणितावरील पकड…

  • गुजरातचे भाजप आमदार कनुभाई पटेल यांचा तुळजापूरमध्ये जंगी सत्कार

    पुजारी फाउंडेशन’कडून शाल, श्रीफळ व आई तुळजाभवानी प्रतिमा देऊन गौरव तुळजापूर   /  प्रतिनिधी गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार कनुभाई करमशीभाई पटेल यांनी आज बुधवार दि. २७ रोजी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर नगरीत हजेरी लावली. आई भवानीचे दर्शन घेऊन त्यांनी देश व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले. या दौऱ्याचे औचित्य साधून…

  • एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी प्रशासन सज्ज ; परीक्षा केंद्रांभोवती कडक निर्बंध लागू

    धाराशिव   /  प्रतिनिधी  महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील १८७२  उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार परीक्षा काळात केंद्र…

  • वादळी वाऱ्याचा कहर ; शेतकऱ्यांचे सौर पंप, गोठे, कडब्याच्या गंजींचे अतोनात नुकसान

    पंचनामे करून तातडीने भरीव मदत द्या ; संतप्त शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी कळंब  / प्रतिनिधी : कळंब तालुक्यातील करंजकल्ला, लोहटा पूर्व, लोहटा पश्चिम, हिंगणगाव यासह परिसरात दि. २४ व २५ मे  रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः शेतामध्ये उभारण्यात आलेले सौर पंप, विहिरीवरील सौर यंत्रणा तसेच…

  • माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाला डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा जाहीर पाठिंबा

    धाराशिव   /  प्रतिनिधी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या व न्याय्य हक्कांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह  पाटील यांनी भेट देत आंदोलक कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या हक्कांसाठीच्या प्रत्येक लढ्यात कायम सोबत राहण्याची ग्वाही दिली. आंदोलनस्थळी उपस्थित माथाडी कामगारांच्या समस्या, अडचणी…

  • तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व ज्ञानज्योती फाउंडेशनच्या वतीने माकणी येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

    लोहारा  /  प्रतिनिधी) तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर (नेरूळ, नवी मुंबई) व ज्ञानज्योती फाउंडेशन (उमरगा) यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील माकणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात दि.26 मे 2026 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नेते किशोर (नाना) साठे…

  • पत्रकार अनिल आगलावे यांना ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी आरळी बुद्रुक (ता. तुळजापूर) येथील सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले अनिल आगलावे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रतिष्ठेचा “डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.आगलावे हे पत्रकारितेसोबतच सरपंच परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख, नाभिक महामंडळ धाराशिव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, आमदार संवाद मंच तुळजापूर मुख्य संयोजक, आरळी बुद्रुक…

  • एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन · आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या…