खाजगी सोनोग्राफी व एमटीपी केंद्रांची पाहणी ; गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज धाराशिव / प्रतिनिधी “गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा” (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम (Medical Termination of Pregnancy Act) यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी सोनोग्राफी व एमटीपी (Medical Termination of Pregnancy) केंद्राला…
धाराशिव / प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी जिल्हा परिषद प्रशाला, वडगाव सिद्धेश्वर ता. जि. धाराशिव येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात गावातून विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी काढून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संदेश देणारे घोष पट्ट्या घेऊन त्यांच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. नवीन शैक्षणिक वर्षात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव -बीड -लातूर विधानपरिषद महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी आज शिवसेना नेते, माजी आरोग्य मंत्री व आमदार तानाजी सावंत यांची आज भेट घेतली. भेटी दरम्यान विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली. नुकत्याच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार सावंत यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळुंके,रामचंद्र घोगरे…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,या अभियानाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाने निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल ३५ लाखांहून अधिक…
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रभात फेरी , बैलगाडीतील मिरवणूक व नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रशांत कावरे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1074 शाळा व इतर खाजगी शाळांमध्ये उद्या सोमवार दिनांक 15 जून रोजी तब्बल दीड महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार असून शाळेतील इमारतीत पुन्हा एकदा विद्यार्थीरुपी चिमण पाखरांचा किलबिलाट ऐकावयास मिळणार आहे. जिल्ह्यातील…
उमरगा / प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख व माजीमंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘गोवर्धन गोशाळा, त्रिकोळी’ येथे एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ औपचारिकता म्हणून शुभेच्छा न देता, समाजाप्रती आपले कर्तव्य बजावण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या मंगल…
कळंब / प्रतिनिधी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यापासून आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. केवळ दोन आठवड्यांत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा संशयित भेसळीचा साठा जप्त करत मोठे रॅकेट उध्वस्त केले आणि थेट मकोका लावण्याचा इशारा दिला. त्यांच्या या धडक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि हितसंबंधीयांमध्ये…
प्रा. डॅा. गजानन राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांत समावेश! परंडा / प्रतिनिधी परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॅा. श्री. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबद्दल भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी प्रा. डॅा. राशीनकर यांचे दूरध्वनीवर संपर्क साधून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या…
तुळजापूर / प्रतिनिधी विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेवर नुकतेच बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे यांनी शनिवारी (दि. १३ जून) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री तुळजाभवानी मातेचे…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल भाग्यश्री भक्ते व रेश्मा नान्नजकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवयित्री जनाताई गोरे, उमेद च्या प्रेरीका पूजा चव्हाण, माजी उपसरपंच जयदेवी शिराळ, जयश्री माळी, रोषणी कर्णावर, छायाताई सोमाणी, राहुल गायकवाड, गोरख माळी, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.