Live News…..Breaking News!

.

  • परंड्याच्या सुपुत्राचा जगात अभिमानास्पद डंका

    प्रा. डॅा. गजानन राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांत समावेश! परंडा / प्रतिनिधी परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॅा. श्री. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबद्दल भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी प्रा. डॅा. राशीनकर यांचे दूरध्वनीवर संपर्क साधून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या…

  • नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

    तुळजापूर / प्रतिनिधी विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेवर नुकतेच बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे यांनी शनिवारी (दि. १३ जून) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे  अध्यक्ष रोहन देशमुख यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री तुळजाभवानी मातेचे…

  • भाग्यश्री भक्ते व रेश्मा नान्नजकर यांचा सत्कार

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल भाग्यश्री भक्ते व रेश्मा नान्नजकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवयित्री जनाताई गोरे, उमेद च्या प्रेरीका पूजा चव्हाण, माजी उपसरपंच जयदेवी शिराळ, जयश्री माळी, रोषणी कर्णावर, छायाताई सोमाणी, राहुल गायकवाड, गोरख माळी, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.

  • राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने विविध ठिकाणी ५९ रोपांचे वृक्षारोपण.

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या दि.१४ जून वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रायझिंग क्रिकेट अकॅडमीचे संयोजक राम हिरापुरे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ५९ झाडे विविध ठिकाणी लावण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी…

  • मुंबई येथे बिभिषण रोडगे यांचा राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

    परंडा / प्रतिनिधी मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बिभिषण गणपती रोडगे यांना राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार – 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अली खान…

  • रुपामाता फाऊंडेशन, रुपामाता अर्बनकडून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान

    धाराशिव / प्रतिनिधी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे ही समाजाभिमुख सहकाराची परंपरा जपत रुपामाता फाऊंडेशन तसेच रुपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव, शाखा येडशी यांच्यावतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रुपामाता उद्योग समूह व रुपामाता अर्बन/मल्टीस्टेट चे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड पाटील तसेच कार्यकारी संचालक अँड. अजित…

  • धारासूर मर्दिनी फेडरेशन च्या वतीने सामाजिक अधिक मास उपक्रमगरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

    धाराशिव  / प्रतिनिधी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ उज्ज्वला कुलकर्णी  यांच्या पुढाकाराने व धारासुर मर्दिनी महिला फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक   13 जून रोजी अमेरिका येथील बहीण शिल्पा अजय डोंगरे ,व  पुणे येथील अपर्णा पुराणिक आणि अश्विनी कुलकर्णी यांनी याही वर्षी  पाचवी ते आठवीच्या 50  विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे तसेच खाऊ चे वाटप केले. यावेळी त्यांच्या मातोश्री मा.…

  • थेट दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी

    तुळजापुर / प्रतिनिधी एका मराठी वृत्तवाहिनीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील काही पुजाऱ्यांकडून भाविकांची थेट दर्शनाच्या नावाखाली पैसे घेऊन लूट होत असल्याबाबचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने तात्काळ कारवाई करत अभिषेक अशोकराव साळुंखे आणि हर्षल विनोद चव्हाण या दोघांना ५ वर्ष मंदिर प्रवेश बंदी घातली आहे. या कालावधीत…

  • जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

    श्रीकृष्ण मुंदडा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया मावळते अध्यक्ष महेश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक मदनलाल मिनीयार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सहसचिव व अन्य पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी श्रीकृष्ण मुुंदडा यांची बिनविरोध…

  • काँग्रेस भवनात उमेश राजेनिंबाळकर यांचा भव्य पदग्रहण सोहळा; संघटन बळकटीचा निर्धार

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश राजेनिंबाळकर यांचा पदग्रहण सोहळा धाराशिव शहरातील काँग्रेस भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. पदग्रहण सोहळ्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, माधव कुतवळ, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, विश्वास शिंदे, काँग्रेसचे…