परंडा / प्रतिनिधी अंमली पदार्थविरोधी कृती दलाने (ANTF) परंडा शहरात धाडसी कारवाई करत सुमारे 57 हजार 200 रुपयांचा अवैध अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून, एका संशयितास अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , दि. 15 जून 2026 रोजी अंमली पदार्थविरोधी कृती दल, छत्रपती संभाजीनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती…
वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप कळंब / प्रतिनिधी येणाऱ्या काळात तंत्रशिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून आयटीआयमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली तर त्यांना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर मोठी मागणी राहील, असे प्रतिपादन कळंबच्या अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील साळुंखे यांनी केले. त्या वेद शैक्षणिक संकुलातील…
धाराशिव / प्रतिनिधी येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभानिमित्त प्रशालेत मुख्याध्यापकांनी नवगतांचे पुष्पगुच्छ व पाठयपुस्तकाचे वाटप करून स्वागत करण्यात आले, यावेळी प्राचार्यांनी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रथम पालक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपल्या पाल्याचा शैक्षणिक पाया या प्रशालेत पक्व होणार असून तुम्ही निर्धास्त राहण्याचे नमूद केले. या पायावरच आपला पाल्य भविष्यात यशाची शिखरे पांदाक्रांत…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळा बालाजी नगर उमरगा येथील इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी चिमुकल्यांचे मन प्रसन्न करणारे तोरण , पुष्पगुच्छ देऊन उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता मोरे , उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, शिक्षण सभापती…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव – लातूर- बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार आता थांबला असून गुरुवार दिनांक 18 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा – महायुतीने मतदानाबाबत खबरदारी घेऊन आपले सर्व नगरसेवक व इतर सदस्य राजकीय सहलीवर पाठविले आहेत. धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग व इतर पालिकांमधील सदस्य सध्या राजकीय सहलीवर…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे इ.१ली प्रवेशपात्र नवागत विद्यार्थ्यांचे तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच पालक मेळावा संपन्न झालाइयत्ता १लीच्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन औक्षण करून पेढे व फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालिकेतील…
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, त्यानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवार,दि.१८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेची गोपनीयता, पारदर्शकता आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रांच्या परिसरात मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.…
धाराशिव / प्रतिनिधी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नगर परिषद शाळा क्रमांक 23 येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संयोजक नितीन काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आनंददायी व्हावी…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक संतोष गायकवाड, प्रा.दयानंद फंड,प्रा.सुचिता कोल्हे, शरद सोनवणे, सूर्यकांत जाधव, बिभीषण देटे, नवनाथ पांचाळ, अच्युत हाजगुडे, रमेश लकापते, दत्तात्रय लंगडे, निलकंठ लाकाळ, प्रसाद राऊत, रामदास झिंजे, तानाजी पांचाळ,बुबासाहेब देशमुख आदी…
श्री तुळजाभवानी शिक्षण पॅटर्न निर्माण करण्यास प्रयत्नशील – सुधीर पाटील तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर शहरातलगत असलेल्या हंगरगा तुळ येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव द्वारा संचालित फ्लाईंग किडस इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल शाखेचे उद्घाटन महंत मावजीनाथ बुवा , महंत इच्छागिरी महाराज आदर्श प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील ,सौ. निर्मला संजय…